Saturday, August 29, 2026
Latest NewsPUNE

 रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न 

 

पुणे प्रतिनिधी — रिपब्लिकन पक्ष (आठवले गट कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात  संपन्न झाला. यावेळी पुण्यातील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला, तसेच  केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची सलग तिसऱ्यांदा राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल पक्षाच्या वतीने  अभिनंदन ठराव पारित करण्यात आला.

या मेळाव्याला शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर, नगरसेवक नीलेश आल्हाट, नगरसेविका निशाताई मानवतकर, मोहन जगताप, महिपाल वाघमारे, संतोष आरडे, सुधीर वाघमोडे, माजी नगरसेवक जयदेव रंधवे, अर्जुन आल्हाट, आशिष भोसले, रवी अवसरमल,  अक्षय अवसरमल, संतोष खरात, विनोद टोपे, संदीप धांडोरे, अविनाश गायकवाड, अविनाश कांबळे, अविनाश कदम, दिशा रणदिवे, मीनाज मोमिन, नीलेश रोकडे, यशवंत नडगम, शमसुद्दीन शेख,  फिरोज खान, मुशताक शेख, रजाक सयद, अतुल भालेराव, बुद्धिशा रंधवे, उज्वला सर्वगोड,थोरात ताई,आदींसह साडेतीनशेहून अधिक कार्यकर्ते व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी  इतर पक्षांतून रिपब्लिकन पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पक्षवाढीसाठी स्थानिक पातळीवर नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांना नियुक्तीपत्रे २२ मार्च रोजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते प्रदान करण्याचे ठरले.

दरम्यान, महापालिका निवडणुकीनंतर पुणे शहरातील वाहतूक कोंडी, २४ तास समान पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा यांसारख्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यात आले. पक्ष सत्तेत सहभागी असला तरी जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी आवश्यक असल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. पुण्यातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर पाठपुरावा करण्याचा आणि प्रसंगी आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा निर्धार यावेळी पक्षाने व्यक्त केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading