Tuesday, April 21, 2026
BusinessLatest News

फिनटेक युनिकॉर्न मनीव्ह्यू लिमिटेडकडून सेबी (SEBI)कडे डीआरएचपी दाखल

 

१,५०० कोटी रुपयांचे नवीन भांडवल उभारले जाणार, तसेच १३.६ कोटी इक्विटी शेअर्सचे ओएफएस (ऑफर फॉर सेल)

मनीव्‍ह्यू लिमिटेड या भारतातील मध्यम उत्पन्‍न गटातील व्‍यक्तींना आर्थिक सेवा देणाऱ्या ग्राहक-केंद्रित, डिजिटल ओन्‍ली, कर्ज-आधारित फिनटेक प्‍लॅटफॉर्मने इनिशियल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ)च्‍या माध्‍यमातून निधी उभारण्यासाठी भांडवल बाजार नियामक सेबीकडे (SEBI) आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) दाखल केला आहे. मनीव्ह्यू अॅप एकाच प्लॅटफॉर्मवर कर्ज घेणे, व्यवहार करणे, गुंतवणूक करणे आणि संरक्षण अशा चार मुख्य श्रेणींमध्ये आर्थिक उत्पादने उपलब्ध करून देते, ज्यामुळे वापरकर्त्यांच्या विविध आर्थिक गरजा पूर्ण होतात.

आयआयटी दिल्लीचे पदवीधर असलेले व्यवस्थापकीय संचालक (एमडी) व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पुनीत अग्रवाल आणि कार्यकारी संचालक व मुख्य तंत्रज्ञान अधिकारी संजय अग्रवाल यांनी २०१४ मध्ये मनीव्ह्यूची स्थापना केली. या कंपनीला एक्सेल, टायगर ग्लोबल, रिबिट कॅपिटल अशा मार्की गुंतवणूकदारांचे पाठबळ आहे.

उच्‍च वाढ व नफाक्षमतेचा ट्रॅक रेकॉर्ड असलेली मनीव्ह्यू ही आधुनिक काळातील अद्वितीय सूचीबद्ध कंपनी आहे. कंपनी आर्थिक वर्ष २०२२ पासून नफ्यात आहे, तसेच कंपनीने आपला वाढीचा वेग कायम राखला आहे. आर्थिक वर्ष २०२४ च्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२५ मध्ये कंपनीच्या करपूर्व नफ्यामध्‍ये (पीबीटी) वार्षिक ६१ टक्‍के वाढ झाली आहे.

कंपनीचे मुख्य उत्पादन २०१७ मध्ये लाँच करण्यात आलेले डिजिटल वैयक्तिक कर्ज आहे, जे महसूल वाढीचा प्रमुख स्रोत आहे. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत कंपनीची व्यवस्थापनाखालील मालमत्ता (मॅनेज एयूएम) १९,८१४ कोटी रुपये होती. डिजिटल कर्ज क्षेत्रात अग्रणी असलेल्या मनीव्ह्यूचा आर्थिक वर्ष २०२५ मधील एकूण डिजिटल असुरक्षित वैयक्तिक कर्ज वितरणात जवळपास ११ टक्‍के वाटा होता. तसेच, डिजिटल असुरक्षित वैयक्तिक कर्ज श्रेणीत (असूचीबद्ध कंपन्यांमध्ये) कंपनीचे एयूएम सर्वाधिक आहे. ही प्रबळ कामगिरी कंपनीच्या आर्थिक निकालामधून दिसून आली आहे, जेथे आर्थिक वर्ष २०२५ साठी कंपनीने २,३७९ कोटी रुपयांचा महसूल आणि २४० कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे.

मनीव्ह्यू आपल्या या प्रबळ आर्थिक कामगिरीचे श्रेय ग्राहक-केंद्रित विचारसरणी, प्रबळ तंत्रज्ञान व एआय क्षमता आणि भागीदारांचे वैविध्यपूर्ण नेटवर्क असलेल्या कॅपिटल-लाइट मॉडेलला देते.

मनीव्ह्यू डेटा, तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांचा प्रभावी वापर करून वापरकर्त्यांना त्यांच्या गरजेनुसार सर्वोत्तम आर्थिक उत्पादने आणि विनासायास डिजिटल अनुभव देते. या प्लॅटफॉर्मचे १२५ दशलक्षपेक्षा जास्त वापरकर्ते आहेत, ज्‍यामध्‍ये ३६.२० टक्‍के सीएजीआर दराने वाढ होत आहे. तसेच, कंपनी भारतातील ९९.५५ टक्‍के पिन कोडवर सेवा देत आहे. कंपनीचे जवळपास ७९ टक्‍के वापरकर्ते द्वितीय श्रेणी आणि त्यापुढील शहरांमधील आहेत. या वापरकर्त्यांचे सरासरी मासिक उत्पन्‍न ४७,००० रुपये आणि सरासरी वय ३२ वर्षे आहे, ज्‍यामधून कंपनीची भारतातील मध्यम उत्पन्‍न गटातील उत्तम पोहोच दिसून येण्‍यासोबत स्थिर सहभाग दिसून येतो.

मनीव्ह्यूचे तंत्रज्ञान आणि एआय-आधारित ऑपरेटिंग मॉडेल पूर्णपणे मानवी हस्तक्षेपाशिवाय आणि विनाअडथळा ग्राहक प्रवास सक्षम करते, ज्यामुळे सुलभता, विस्तारक्षमता आणि खर्चात बचत होते. कंपनीतील ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त कर्मचारी तंत्रज्ञान आणि डेटा भूमिकांसाठी समर्पित आहेत, ज्‍यामुळे कंपनीने काळानुसार मोठ्या प्रमाणात ऑपरेटिंग नफा उभारला आहे. परिणामी, एकूण उत्पन्‍नाच्या तुलनेत ऑपरेटिंग खर्च आर्थिक वर्ष २०२३ मधील ६२.८४ टक्‍क्‍यांवरून घसरून ३१ डिसेंबर २०२५ रोजी समाप्‍त झालेल्‍या नऊ महिन्यांच्या कालावधीत ३५.१९ टक्‍क्‍यांवर आला आहे.

कर्ज देणाऱ्या भागीदारांच्या वैविध्यपूर्ण नेटवर्कच्‍या पाठबळासह मनीव्ह्यूचे कॅपिटल-लाइट मॉडेल भांडवलाची उच्‍च कार्यक्षमता राखून व्यवसायाचा विस्तार करण्यास मदत करते. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत कंपनीची व्यवस्थापनाखालील मालमत्ता (मॅनेज एयूएम) १९,८१४ कोटी रुपये होती आणि कंपनीच्या नफ्यात सातत्याने सुधारणा होत आहे, ज्यामध्ये रिटर्न ऑन इक्विटी (आरओई) १५.९ टक्‍क्‍यांवर पोहोचला आहे.

मनीव्ह्यू आज भारतातील मध्यम उत्पन्‍न गटातील बदलत्या गरजांनुसार क्रेडिट कार्ड, अर्न वेज अॅक्‍सेस, गृहकर्ज, मालमत्तेवर कर्ज, विमा, डिजिटल गोल्ड, यूपीआय व्यवहार आणि बिल पेमेंट अशा सर्वसमावेशक आर्थिक उत्पादनांची श्रेणी ऑफर करते. वारंवार होणारा वापर आणि एकापेक्षा जास्त उत्पादनांचा स्वीकार यांचे एकत्रिकरण करत कंपनी यूजर लाइफटाइम व्हॅल्यू वाढवण्यास, तसेच वापरकर्त्‍यांसोबत सखोल, दीर्घकालीन संबंध निर्माण करण्यास सक्षम आहे.

आर्थिक वर्ष २०२५ मध्ये मनीव्ह्यूने २,३७९ कोटी रुपयांचा महसूल आणि २४० कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता. ३१ डिसेंबर २०२५ रोजी समाप्‍त झालेल्‍या नऊ महिन्यांच्या कालावधीसाठी (आर्थिक वर्ष २०२६ची नऊमाही) कंपनीने २,४०९ कोटी रुपयांचा महसूल आणि २४५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा (अपवादात्मक बाबी वगळता) नोंदवला आहे, जो कंपनीच्‍या मागील संपूर्ण आर्थिक वर्ष २०२५ च्या महसूल आणि नफ्यापेक्षाही अधिक आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading