Thursday, May 14, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

विदेशी महिलेला लुबाडणारा टॅक्सीचालक गजाआड

 

केवळ 400 मीटर अंतराचे आकारले 18000 भाडे

मुंबई प्रतिनिधी

सहार आंतरराष्ट्रीय विमानतळापासून केवळ 400 मीटर अंतरावर असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जाण्यासाठी अमेरिकेहून आलेल्या महिलेकडून तब्बल 18 हजार रुपये भाडे आकारणाऱ्या टॅक्सी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

अर्जेंटिना एरियानो या अमेरिकेहून मुंबईत आल्यानंतर हॉटेलमध्ये जाण्यासाठी त्यांनी टॅक्सी घेतली. टॅक्सी चालक देवराज यादव (वय 50) याने थेट हॉटेलमध्ये न जाता अर्जेंटिना यांना अंधेरीच्या भागात फिरवले. यावेळी त्याच्याबरोबर आणखी एक जण होता. अंधेरीत सुमारे अर्धा तास फिरल्यानंतर त्याने अर्जेंटिना यांना हॉटेलवर आणून सोडले. त्याबद्दल या महिलेकडून 200 डॉलर अर्थात 18 हजार रुपये एवढे पैसे घेतले.

या प्रकारामुळे हजारलेल्या महिलेने 26 जानेवारी रोजी x या समाज माध्यमावरून या घटनेची माहिती देणारी पोस्ट प्रसिद्ध केली. सुदैवाने अर्जेंटिना यांनी या टॅक्सीचा क्रमांक देखील या पोस्टमध्ये नमूद केला. त्यावरून पोलिसांनी तपास करून देवराज यादव याला अटक केली आहे. त्याची टॅक्सी जप्त करण्यात आली असून टॅक्सीचा परवाना व वाहन चालवण्याचा परवाना रद्द करण्यासाठी परिवहन विभागाशी संपर्क साधण्यात आल्याचे सहार पोलिसांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading