उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची होणार सीआयडी चौकशी
मुंबई प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी जीवघेणा ठरलेल्या विमान अपघाताची चौकशी राज्य अन्वेषण विभाग अर्थात सीआयडीमार्फत करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.
अजित पवार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईहून बारामती ला जात असताना बारामती विमानतळावर त्यांचे विमान कोसळले. त्याचा स्फोट झाला आणि विमानातील सर्व सहा जण मृत्युमुखी पडले.
या अपघाताची केंद्रीय व राज्याच्या तपास यंत्रणा चौकशी करीत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सूचनेनुसार नागरी विमान वाहतूक विभागाच्या वतीने या अपघाताची तांत्रिक चौकशी करण्यात येत आहे. त्यात या अपघाताच्या कारणांचा मागोवा घेतला जाणार आहे.
त्याचप्रमाणे सीआयडीमर्फत देखील या अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली आहे. बारामती पोलीस ठाण्यात अजित पवार व अन्य अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यानुसारच ही चौकशी केली जाणार आहे. स्थळी कोणालाही जाऊ न देण्याचे आदेश सीआयडीमार्फत स्थानिक पोलिसांना देण्यात आले आहे. न्यायवैद्यक विभागाने यापूर्वीच न्यायवैद्यक विभागाने यापूर्वीच अपघात स्थळाला भेट देऊन तपासाच्या दृष्टीने आवश्यक ते नमुने ताब्यात घेतले आहेत.
