Wednesday, June 10, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

‘उद्धवस्त’ या एकाच शब्दात सुप्रिया सुळे यांनी केल्या भावना व्यक्त

 

अजितदादांच्या अपघाती निधनानंतर शोकाकूल

पुणे: प्रतिनिधी

अजितदादांच्या अपघाती निधनानंतर शोकाकूल झालेल्या त्यांच्या भगिनी सुप्रिया सुळे यांनी ‘उद्धवस्त’ या एकाच शब्दात आपल्या आणि समस्त पवार कुटुंबीयांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. शरद पवार यांच्यानंतर पवार कुटुंबीयांसाठी अजित पवार हाच मोठा आधार होता.

बारामती येथे विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतात अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी दिल्लीत असलेल्या खासदार सुप्रिया सुळे व अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार तातडीने बारामतीकडे रवाना झाल्या.

आपल्या बंधूंच्या अकाली निधनाने शोक अनावर झालेल्या सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हाट्स अँप स्टेटस वर उध्वस्त या एकाच शब्दात आपल्या भावना व्यक्त केले आहेत. अजित पवार हे सुप्रिया सुळे यांचे चुलत बंधू आहेत. आपले वडील शरद पवार यांच्यासह अजित दादांच्या पावलावर पाऊल ठेवूनच त्या राजकारणात वावरल्या. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये दहा वर्षांचे अंतर आहे.

आज सकाळी अजित पवार यांच्यासह अन्य शासकीय व विमानातील कर्मचारी असे पाच जण असलेले खाजगी कंपनीचा विमान बारामती विमानतळावर उतरत असताना झोक घेत कोसळले. अजित पवार यांच्यासह या अपघातात जखमी झालेल्यांना बारामतीतील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र, अपघातग्रस्तांपैकी कोणाचाही जीव वाचू शकला नाही.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading