विशाल साळवी, बी.एस. तुलसीराम यांना विजेतेपद !!
नितीन किर्तने, नीलकंठ डांबरे, मधुकर के.आर., आर.सी. गंगाधन यांना दुहेरी मुकूट !!
पुणे : सोलारीस क्लब आणि रविंद्र पांड्ये टेनिस ॲकॅडमी (आरपीटीए) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बाराव्या ‘सोलारीस करंडक’ वरिष्ठ पुरूष राष्ट्रीय टेनिस २०२६ स्पर्धेत नितीन किर्तने, नीलकंठ डांबरे, मधुकर के.आर. आणि आर.सी. गंगाधन यांनी आपापल्या गटात एकेरी आणि दुहेरी गटाचे विजेतेपद संपादन करून दुहेरी मुकूट पटकावला. विशाल साळवी याने अनपेक्षित निकाल नोंदवित ३५ वर्षावरील गटाचे विजेतेपद पटकावले.
कर्वेनगरमध्ये मयुर कॉलनीमधील सोलारीस क्लब येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या मुख्य ड्रॉच्या ३५ वर्षावरील गटार विशाल साळवी याने अग्रमानांकित संदीप पवार याचा ६-४, ७-५ असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवित विजेतेपद संपादन केले. ४५ वर्षावरील गटात गतविजेत्या आणि पुण्याच्या नितीन किर्तने याने अरूण कटारीया याचा ६-१, ६-० असा सहज पराभव केला. ५५ वर्षावरील गटात नीलकंठ डांबरे याने पुण्याच्या अजय कामत याचा ६-३, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. ६५ वर्षावरील गटात मधुकर के.आर. याने श्रीकृष्ण कुलकर्णी याचा ०-६, ६-३, १०-४ असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपद मिळवले. ७० वर्षावरील गटात बी.एस. तुलसीराम याने किशोर सबनानी याचा ६-२, ६-० असा सहज पराभव करून विजेतेपदावर निश्चित केले. ७५ वर्षावरील गटात सी.आर. गंगाधरन याने अजित पेंढारकर याचा ६-१, ६-३ असा पराभव करून विजेतेपद मिळवले.
दुहेरी गटामध्ये ३५ वर्षावरील गटात रविंद्र पांडे व भिष्म देसाई यांनी वैभव अवघडे व गणेश देवखिळे याचा ६-१, २-६, १०-७ असा पराभव केला. ४५ वर्षावरील गटात नितीन किर्तने व मुकूंद जोशी या जोडीने अरूण कटारीया व विकास वासवानी यांचा ६-०, ६-२ असा पराभव केला. याशिवाय ५५ वर्षावरील गटात केतन बेडेकर आणि निलकंठ डांबरे, ६५ वर्षावरील गटात आर.व्हि. रामाराजु व के.आर. मधुरकर आणि ७० वर्षावरील गटात सागर इंजीनिअर व एकनाथ किणेकर तसेच ७५ वर्षावरील गटात सी.आर. गंगाधरन व श्रीकांत पारेख यांनी विजेतेपद मिळवले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोलारीचे संचालक जयंत पवार आणि सोलारीसचे सीईओ हृषीकेश भानुशाली यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रविंद्र पांड्ये टेनिस ॲकॅडमी (आरपीटीए)चे संचालक रविंद्र पांड्ये, ग्लोबल वरिष्ठ टेनिस संघटना (जीएसटीए)चे अजित पेंढारकर, स्पर्धेचे व्यस्थापक राजेश सपकाळ, खेळाडू आदि मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकालः मुख्य ड्रॉः अंतिम फेरीः
३५ वर्षावरील गटः विशाल साळवी वि.वि. संदीप पवार ६-४, ७-५;
४५ वर्षावरील गटः नितीन किर्तने वि.वि. अरूण कटारीया ६-१, ६-०;
५५ वर्षावरील गटः नीलकंठ डांबरे वि.वि. अजय कामत ६-३, ६-२;
६५ वर्षावरील गटः मधुकर के.आर. वि.वि. श्रीकृष्ण कुलकर्णी ०-६, ६-३, १०-४;
७० वर्षावरील गटः बी.एस. तुलसीराम वि.वि. किशोर सबनानी ६-२, ६-०;
७५ वर्षावरील गटः सी.आर. गंगाधरन वि.वि. अजित पेंढारकर ६-१, ६-३;
दुहेरीः अंतिम फेरीः
३५ वर्षावरील गटः रविंद्र पांडे/भिष्म देसाई वि.वि. वैभव अवघडे/गणेश देवखिळे ६-१, २-६, १०-७;
४५ वर्षावरील गटः नितीन किर्तने/मुकूंद जोशी वि.वि. अरूण कटारीया/विकास वासवानी ६-०, ६-२;
५५ वर्षावरील गटः केतन बेडेकर/निलकंठ डांबरे वि.वि. डॉ. राजेश मित्तल/मनोज साठीया ६-१, ७-५;
६५ वर्षावरील गटः आर.व्हि. रामाराजु/के.आर. मधुरकर वि.वि. प्रमोद पाटील/भुपेंद्र पाटील ६-४, ६-४;
७० वर्षावरील गटः सागर इंजीनिअर/एकनाथ किणेकर वि.वि. एम. सुरेश/बी.एस. तुलसीराम ३-६, ६-४, १३-११;
७५ वर्षावरील गटः सी.आर. गंगाधरन/श्रीकांत पारेख वि.वि. अजित पेंढारकर/शाम गायकवाड वि.वि. ५-७, ७-६(१०-६), १०-७;
