Wednesday, June 17, 2026
ENTERTAINMENTLatest News

“हे माझं घर आहे आणि इथे फक्त ‘भाऊगिरी’ चालणार!” – रितेश देशमुख !

कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या वादाचा धूर निघत आहे, पण यावेळचा धमाका स्पर्धकांनी नाही तर स्वतः शोचे होस्ट रितेश देशमुख यांनी केला आहे. ‘भाऊचा धक्का’ या विशेष भागात रितेश देशमुख यांनी घरातील माहोल आणि धक्काबुक्की पाहून विशाल आणि ओमकार या स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली. रितेश भाऊंनी स्पष्ट केले की हा शो आता फक्त तरुणांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर महाराष्ट्रातील प्रत्येक घरात संपूर्ण कुटुंब एकत्र बसून हा कार्यक्रम पाहतो. अशा वेळी स्पर्धकांनी दाखवलेले हे वर्तन चुकीचा आदर्श देत असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. आपल्याकडे दोघे आहेत ज्यांना बोलण्यासाठी काहीच नाहीये का? फक्त मारामारी आणि स्वतः:च्या बॉडीचा, ताकदीचा प्रचंड माज आहे … एकमेकांच्या अंगावर धावून जायचं , धक्काबुक्की करायची, धमक्या द्यायच्या हेच आदर्श तुम्ही प्रेक्षकांना देणार का?” अशा शब्दांत रितेश भाऊंनी आपली नाराजी व्यक्त केली.

रितेश भाऊ म्हणाले, “विशाल आणि ओमकार, नीट ऐका. हे घर आहे, रस्त्यावरचा नाका नाही जिथे तुमची दादागिरी चालेल. लक्षात ठेवा, हे माझं घर आहे आणि इथे दादागिरी नाही, तर फक्त ‘भाऊगिरी’ चालणार!”

रितेश देशमुख यांनी ज्या पद्धतीने घरातील शिस्त जपण्याचा प्रयत्न केला आहे, ते कौतुकास्पद आहे. केवळ ओरडून नाही, तर अत्यंत संयमी पण कडक शब्दांत त्यांनी स्पर्धकांना त्यांच्या चुकीची जाणीव करून दिली. अजून काय काय घडले जाणून घेण्यासाठी बघा भाऊंचा धक्का…

चुकवू नका! नक्की बघा ‘बिग बॉस मराठी – भाऊचा धक्का’, आज रात्री ८:०० वाजता फक्त कलर्स मराठी आणि JioHotstar वर!

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading