Tuesday, April 7, 2026
ENTERTAINMENTLatest News

बिग बॉस मराठी – भाऊचा धक्का : रितेश देशमुख यांनी केले प्रभु शेळकेचे भरभरून कौतुक!

कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ सध्या घराघरात चर्चेचा विषय ठरत आहे. आजचा ‘भाऊचा धक्का’ या भागात शोचे सूत्रसंचालक रितेश देशमुख यांनी घरातील सर्वात लाडके आणि प्रभावी सदस्य प्रभु शेळके याच्या खेळाचे तोंडभरून कौतुक केले.
प्रभुने आपल्या साध्या आणि विनोदी स्वभावाने प्रेक्षकांचे तसेच रितेश भाऊंचेही मन जिंकले आहे. त्याच्या मनोरंजनाच्या शैलीवर भाष्य करताना रितेश देशमुख म्हणाले:”प्रभु, बाहेरच्या दुनियेत तुम्ही एका कॅमेराने कंटेंट बनवता, इथे १०० कॅमेरे आहेत. तुम्ही हसवलत, तुम्ही रडवलत. मी बाकी सगळ्यांना सांगू इच्छितो, तुम्ही यांना छोटे समजत आहात, पण या आठवड्यातले हे खरे एंटरटेनमेंटचे डॉन आहेत!”

रितेश भाऊंच्या या शब्दांनी प्रभु शेळके भावूक झाला आणि त्याने नम्रपणे सर्वांचे आभार मानले. घरात इतर सदस्यांच्या तुलनेत प्रभु जरी शांत वाटत असला तरी, त्याच्या या ‘डॉन’ अवताराने आता सदस्यांमध्ये त्याची एक वेगळीच दहशत निर्माण होईल यात शंका नाही.

नक्की बघा, ‘बिग बॉस मराठी – भाऊचा धक्का’, आज रात्री ८:०० वा. फक्त कलर्स मराठी आणि JioHotstar वर!

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading