Friday, April 3, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

काँग्रेसचे प्रशांत जगताप, साहिल केदारी विजयी

पुणे : महानगर पालिका निवडणुकीत अजित पवार यांच्यासोबत आघाडी नको असा पवित्र घेत शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा डेट कॉँग्रेस मध्ये गेलेले प्रशांत जगताप विजय झाले आहेत. जगताप यांच्या विजयाने पुण्यात काँग्रेसनं खातं खोललं, प्रशांत जगताप यांनी विजय खेचून आणला असून  भाजपाच्या विरोधात प्रशांत जगताप जिंकले असल्याने हा विचाराधारेचा विजय असल्याचे मानले जात आहे आणि सत्तेसाठी विचारांना तिलांजलि देणाऱ्यांना हि मोठी चपराक आहे. 

वानवडी – साळुंखे विहार प्रभाग क्रमांक १८ ड मधून प्रशांत जगताप यांनी काँग्रेस मधून भाजपमध्ये गेलेल्या अभिजीत शिवरकरांचा पराभव केला.  कॉँग्रेसचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचा मुलगा अभिजीत शिवरकर हे ऐनवेळी काँग्रेसमधून भाजपा मधे गेले होते.  प्रशांत जगताप यांची आई रत्नप्रभा जगताप या मात्र पराभूत झाल्या आहेत.  तर सहकारी उमेदवार साहिल केदारी यांना निवडून आणण्यात जगताप यशस्वी ठरले आहेत. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading