Wednesday, April 8, 2026
BusinessLatest News

Constro 2026 आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात महिंद्रा पॉवरॉल व श्याम ग्लोबल टेक्नो व्हेंचर्सचा भव्य सहभाग

 

पुणे – पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग रिसर्च फाउंडेशन (PCERF) यांच्या वतीने, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) संकल्पना भागीदार म्हणून आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सहकार्य भागीदार म्हणून आयोजित Constro 2026 International Expo या 20व्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे नुकतेच भव्य उद्घाटन झाले. बांधकाम व अभियांत्रिकी क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, नवकल्पना आणि जागतिक संधी यांचे हे महत्त्वाचे व्यासपीठ ठरले आहे.

या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात महिंद्रा पॉवरॉल आणि श्याम ग्लोबल टेक्नो व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी आपले आकर्षक स्टॉल उभारले होते. या स्टॉलला प्रदर्शनास भेट देणाऱ्या नागरिकांकडून आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींंकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसून आला. स्टॉलद्वारे जनरेटर क्षेत्रातील अत्याधुनिक उत्पादने, गुणवत्ता आणि विश्वासार्ह सेवा यांची सविस्तर माहिती उपस्थितांना देण्यात आली.

यावेळी नरेंद्र गोयल व यामिनी गोयल संचालक, श्याम ग्लोबल टेक्नो व्हेंचर्स प्रा. लि. आणि इंटेलिपार्क, संजय जैन वरिष्ठ उपाध्यक्ष, महिंद्रा पॉवरॉल, अंकूर श्रीवास्तव वरिष्ठ महाव्यवस्थापक, आणि मृणाल विपणन प्रमुख, यांच्यासह कंपनीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना संजय जैन म्हणाले, “जनसेट हा आमचा मुख्य व्यवसाय असून महिंद्रा पॉवरॉल हा भारतातील क्रमांक एक ब्रँड आहे. आमचे मुख्यालय पुण्यात आहे आणि या प्रदर्शनात सहभागी होताना आम्हाला प्रचंड आनंद होत आहे. हे एक उत्कृष्ट प्रदर्शन असून यामधून आम्हाला निश्चितच चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. आमचे भागीदार श्याम ग्लोबल यांच्यासोबत आम्ही हा स्टॉल उभारला असून महाराष्ट्रात, विशेषतः बांधकाम क्षेत्रात त्यांचे काम अत्यंत उल्लेखनीय आहे.”

नरेंद्र गोयल म्हणाले, “देशभरातील बांधकाम क्षेत्रातील सर्व कंपन्या व बांधकाम व्यावसायिकांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांच्या विश्वासामुळेच मागील वर्षी महिंद्रा कंपनीला ‘बेस्ट सेलर अवॉर्ड’ प्राप्त झाला असून त्यामध्ये जनरेटर विक्रीचा मोठा वाटा आहे. आमचा नेहमीच प्रयत्न राहील की ग्राहकांना सर्वोत्तम दर्जाचे जनरेटर उपलब्ध करून द्यावेत. सध्या आमच्याकडे 5 केव्हीए पासून 1250 केव्हीए क्षमतेपर्यंतचे जनरेटर उपलब्ध असून, ते पुण्यातील अत्याधुनिक प्रकल्पात निर्मित करून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवले जातात.”

इंटेलीपार्क हे आधुनिक, सुरक्षित आणि स्मार्ट शहरांसाठी तयार केलेले भविष्यदर्शी समाधान आहे. हे सिस्टम पूर्णपणे ऑटोमेटेड असून मानवी हस्तक्षेपाशिवाय कार्य करते. आम्ही 16 मजल्यांपर्यंत मल्टीलेव्हल पार्किंग सोल्यूशन तयार करू शकतो. या संपूर्ण प्रणालीचे संचालन कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या मदतीने होते, ज्यामुळे ती अधिक कार्यक्षम आणि वापरण्यास सोपी बनते.”

अंकूर श्रीवास्तव यांनी सांगितले, “या प्रदर्शनासाठी आम्ही विशेष उत्सुक होतो. येथे आमच्या अपेक्षेप्रमाणेच ग्राहक आणि उद्योग क्षेत्रातील योग्य लोकांशी संवाद साधता येईल, असा आम्हाला विश्वास आहे. भारतासह भारताबाहेरही आमचे काम सुरू असून देशात आज महिंद्रा पॉवरॉल प्रथम क्रमांकावर कार्यरत आहे.”

मृणाल म्हणाल्या,“महिंद्रा पॉवरॉल हा ब्रँड वाढ आणि विश्वासार्हतेसाठी ओळखला जातो. हीच ओळख जगासमोर मांडण्यासाठी आम्ही या प्रदर्शनात सहभागी झालो आहोत. या माध्यमातून नागरिकांना आम्ही हा संदेश देऊ इच्छितो की महिंद्रा मार्फत कोणतेही काम गुणवत्ता न गमावता, योग्य आणि विश्वासार्ह पद्धतीने पूर्ण केले जाते.”

Constro 2026 या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामुळे बांधकाम व ऊर्जा क्षेत्रातील उद्योगांना नव्या दिशा, संधी आणि व्यावसायिक संपर्क मिळणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading