Saturday, June 13, 2026
ENTERTAINMENTLatest News

युद्धाच्या सावटात अडकलेल्या इस्त्रायली कुटुंबासाठी ‘ही’ मराठी मालिका देतेय आनंदाचे क्षण

स्टार प्रवाहच्या ‘ठरलं तर मग’ मालिकेची लोकप्रियता आता महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून जगभर पोहोचली आहे. गेली तीन वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही मालिका भारताबाहेरही तितक्याच उत्साहाने पाहिली जाते, याचं एक हृदयस्पर्शी उदाहरण नुकतंच समोर आलं. इस्त्रायलमध्ये सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या एका कुटुंबाने या मालिकेबद्दलचं आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. डॅनियल कुटुंबाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की, ‘सततच्या तणावपूर्ण वातावरणात ‘ठरलं तर मग’ ही मालिका आमच्यासाठी एक दिलासा ठरते. आम्ही संपूर्ण कुटुंब एकत्र बसून ही मालिका पहातो. आम्हाला ही मालिका खूप आवडते. अर्जुन आणि सायली या मुख्य जोडीसोबतच प्रियाच्या अभिनयाचंही कौतुक.’

सायलीची भूमिका साकारणाऱ्या जुई गडकरीने हा व्हिडिओ शेअर करत भावूक प्रतिक्रिया दिली. ‘गेले काही दिवस ठरलं तर मगची संपूर्ण टीम खूप मेहनत करतेय. ४५ मिनीटांचे एपिसोड रोज सुरु आहेत. काहीही झालं तरी ध्येय एकच एपिसोड थांबता कामा नये. अशातच जगाच्या वेगवेगळ्या भागात सुरु असलेल्या युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या आणि मराठी भाषिकही नसलेल्या इस्त्रायली प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळते तेव्हा मेहनत सार्थकी लागल्यासारखं वाटतं. आपण आपल्या मालिकेच्या माध्यामातून अशा परिस्थितीत अडकलेल्या एका कुटुंबाला आनंद देऊ शकलो याचा मला खूप जास्त आनंद आहे. देव करो आणि ते सगळे कायम सुखरुप राहो अशी भावना जुईने व्यक्त केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading