Tuesday, June 23, 2026
Latest NewsPUNE

FAST इंडिया तर्फे IISER पुणे येथे इंडिया सायन्स फेस्टिव्हल (ISF) 2026 च्या 7व्या आवृत्तीचा शुभारंभ

 

पुणे : फाउंडेशन फॉर अ‍ॅडव्हान्सिंग सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी (FAST इंडिया) तर्फे आज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च (IISER), पुणे येथे इंडिया सायन्स फेस्टिव्हल (ISF) 2026 च्या 7व्या आवृत्तीचा अधिकृत शुभारंभ करण्यात येईल.

IISER पुणे कॅम्पसमध्ये होणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन प्रा. अभय करंदीकर (सचिव, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग), प्रा. के. विजय राघवन (माजी प्रधान वैज्ञानिक सल्लागार, भारत सरकार), वरुण अग्रवाल (को-फाउंडर, FAST इंडिया), आशीष धवन (को-फाउंडर, FAST इंडिया), शील कपूर (CEO, FAST इंडिया), प्रा. मनीषा इनामदार (डायरेक्टर – STEM, JNCASR), प्रा. सुनील भगवत (डायरेक्टर, IISER पुणे) आणि विजय जेरोम (Chief Digital & Information Officer, बजाज ऑटो) यांच्या उपस्थितीत होणार आहे.

दोन दिवस चालणाऱ्या या विज्ञान महोत्सवात देशभरातून २५,००० हून अधिक विद्यार्थी, १,००० प्राध्यापक आणि ५,००० व्यावसायिक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. विज्ञान संवाद मजबूत करणे आणि पुढील पिढीतील नवोन्मेषकांना प्रेरणा देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.

या महोत्सवात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) पोहोचणारे पहिले भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला, संगणक शास्त्रज्ञ आशीष वासवानी, ईशान चट्टोपाध्याय, तसेच नोबेल पारितोषिक विजेते प्रा. वेंकी रामकृष्णन यांच्यासह अनेक नामवंत शास्त्रज्ञ व तज्ज्ञ सहभागी होत आहेत.

ISF 2026 मध्ये तज्ज्ञांची व्याख्याने, संवाद सत्रे, प्रत्यक्ष प्रयोग, लहान मुलांसाठी विज्ञान खेळ, प्रदर्शनं आणि चर्चा यांचा समावेश आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेतील नैतिकता, अंतराळ संशोधन, रेडिओ खगोलशास्त्र, स्टेम सेल संशोधन अशा विविध विषयांवर सखोल मंथन होणार आहे. विज्ञान आणि समाज यांतील दरी कमी करत, सर्व वयोगटांसाठी विज्ञान सुलभ व रंजक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न या महोत्सवातून केला जात आहे.

या महोत्सवांतर्गत डॉ. आशीष वासवानी यांना S. Chandrasekhar Rising Indian Diaspora Scientist 2026 पुरस्कार, तर डॉ. अर्नब भट्टाचार्य यांना Jayant and Mangala Narlikar Rising Indian Scientist in Science Communication 2026 पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

यावेळी बोलताना वरुण अग्रवाल, को-फाउंडर, FAST इंडिया म्हणाले,
“इंडिया सायन्स फेस्टिव्हल 2026 च्या 7व्या आवृत्तीचा शुभारंभ करताना आम्हाला अभिमान वाटतो. यंदा डीप टेक्नॉलॉजी तसेच विज्ञान व तंत्रज्ञानातील संतुलनावर आमचा विशेष भर आहे. उद्योग व शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांचे ज्ञान विशेषतः विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी कार्यशाळा, क्विझ आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून, बजाज, किर्लोस्कर, IISER पुणे, TIFR, IUCAA, MIT विद्यापीठ, DYP, PICT, सिंहगड इन्स्टिट्यूट, सोमय्या विद्याविहार यांसह अनेक नामवंत संस्था आणि कॉर्पोरेट भागीदार या उपक्रमात सहभागी आहेत.

महोत्सवाचा समारोप “India’s Space Odyssey” या विशेष नाट्यप्रयोगाने होणार असून, प्रसिद्ध अभिनेते अखिलेंद्र मिश्रा यांच्या कथनातून भारताच्या अंतराळ प्रवासाची प्रेरणादायी कहाणी सादर केली जाणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading