Wednesday, October 28, 2026
Latest NewsPUNE

प्रभाग 22 हरकानगर मध्ये काँग्रेस उमेदवारांचे पुष्पहार अर्पण करीत उत्साहाने स्वागत

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रभाग 22 मधील अखिल भारतीय काँग्रेस – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार इंदिरा अविनाश बागवे ,अविनाश बागवे ,रफीक शेख व दिलशाद शेख या उमेदवारांचे आज हरकानगर वसाहती मध्ये अतिशय उत्साहात व उमेदवारांना पुष्पहार अर्पण करीत जल्लोषात स्वागत करण्यात आले .पदयात्रेची सुरुवात गोगादेव यांच्या मंदिरात दर्शन घेऊन करण्यात आली. या पदयात्रेत स्थानिक महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या .

प्रत्येक घरोघरी जाऊन प्रत्यक्ष मतदारांना भेट देत त्यांच्या स्थानिक समस्या जाणून घेण्यात आल्या .यावेळी हरकनगर येथे महिलांना बचत गटाच्या व मुक्ता फाउंडेशन च्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्याचं आश्वासन यावेळी इंदिरा अविनाश बागवे यांनी महिलांना दिले .प्रत्यक्ष महिलांशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या अनेक समस्या जाणून घेतल्या व त्या आपण यशस्वीरीत्या सोडवू असे त्यांनी सांगितले.

आज निघालेल्या पदयात्रेत जुबेरबाबू शेख, चंद्रकांत चव्हाण, कविराज संघेलिया, वीरेंद्र घोसरे, मनीष तांदरे, दयानंद अडागळे, यासर बागवे, मधुकर चांदणे, मारुती कसबे, शफीक शेख, दिपक गायकवाड, फारुक बागवान जावेद शेख व इतर अखिल भारतीय काँग्रेस पक्ष व मित्रपक्षाचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Leave a Reply