सरवदे कुटुंबियांचा आक्रोश पाहुन अमित ठाकरेंना ही रडू कोसळले….
माझे पप्पा मला आणून द्या … त्रिशाच्या आर्त टाहोने उपस्थितांचे ही डोळे पाणावले…
सोलापूर/
सोलापूर महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मारहाणीत सोलापूरातील मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांचा खून झाला असून त्यांच्या कुठुंबियांना भेटण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे हे रविवारी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी ठाकरे यंानी सरवदे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी सरवदे यांच्या कुठुंबियांचा आक्रोश पाहुन ठाकरेंना ही रडू कोसळले. तर मृत बाळासाहेब सरवदे यांची मुलगी त्रिशा हिने माझे पप्पा मला आणून द्या असा आर्त टाहो अमित ठाकरे यांच्या समोर फोडला यावेळी उपस्थित असलेल्या सर्वांचेच डोळे पाणावले.
मृत बाळासाहेब सरवदे यांच्या पश्चात पत्नी वंदना आणि दोन मुली आहेत. कुटुंबाचा आधारच गेल्याने सरवदे कुठुंबियावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. मुली लहान असल्याने त्यांच्या भविष्याचे काय असा प्रश्न अनेकांच्या समोर उपस्थित राहिला आहे. नुकताच मुलीचा वाढदिवस झाला हेाता. त्यानंतर एक दिवस ओलांडण्यापूर्वीच बाळासाहेब सरवदे यांचा खून झाल्यामुळे संपूर्ण कुटुंब दुखाच्या दरीत कोसळले आहे. अशा परिस्थितीत त्यांना सावरण्यासाठी अनेकांनी सात्वंनपर भेटी दिल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर रविवारी अमित ठाकरे यांनी सरवदे कुटुंबाची भेट घेतली. यावेळी पत्नी वंदना आणि मुलींचा अक्रोश पाहुन ठाकरेंना ही रडू कोसळले. यावेळी मुलगी त्रिशा हिने माझे पप्पा कोठे गेले आहेत. त्यांना परत घेवून या मला माझे पप्पा आणून द्या अशी मागणी त्रिशाने दस्तुरखुद्द अमित ठाकरे यांच्याकडेच केली. त्यामुळे तिच्या त्या मागणीने उपस्थितांच्या काळजाला ही भेगा पडल्या. तिचे वडील आता परत कधीच येणार नाहीत हे सांगण्याचे धाडस उपस्थिांपैकी कोणीच करत नव्हते. मात्र उपस्थितांच्या डोळ्यात पाणी मात्र दिसून येत होते. राजकीय भांडणातून हा खून झाला असून बाळासाहेब सरवदे यांना न्याय मिळावा यासाठी आपण स्व:ता मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे यावेळी अमित ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच मनसेनेचा सैनिक गेला आहे. तो आमच्या कुठुंबातीलच आहे त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आता आमची असल्याचे ही अमित ठाकरे यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीना सांगितले.
……………
फोटो : मनसे नेते अमित ठाकरे यांनी घेतली सोलापूरातील सरवदे कुठुंबियांना भेट
……………………………………..
