माजी नगरसेवक ॲड. आयुब शेख यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
पुणे : रिपब्लिकन पक्षाचे अल्पसंख्यांक आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष व पुणे महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक ॲड. आयुब शेख यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांच्या समवेत पुणे शहर अध्यक्ष सुनील टिंगरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
ॲड. आयुब शेख हे पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळामध्ये 1997 ते 2002 या कालावधीत सदस्य म्हणून कार्यरत राहिलेले आहेत तसेच 2002 , 2007 मध्ये ते पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून तर 2017 ते 2022 या कालावधीत त्यांच्या पत्नी ॲड. फरजाना शेख या नगरसेविका गटनेत्या म्हणून कार्यरत राहिल्या आहेत. एकेकाळी सुरेश कलमाडी व नंतर रामदास आठवले यांचे विश्वासू राहिलेले आयुब शेख यांनी अजित पवार यांच्याबरोबर काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
“ आयुब शेख यांच्या सोबत येण्याच्या निर्णयाने पक्षाला मोठा फायदा मिळणार असुन त्यांच्यावर पक्षातर्फे अल्पसंख्याक विभागाच्या कार्याघ्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात येत आहे. असे अजित पवार यांनी यावेळी मत व्यक्त केले. “
“ अजित पवार हे कार्यक्षम उपमुख्यमंत्री असून त्यांच्या नेतृत्वात पुणे शहराचा व राज्याचा सर्वांगीण विकास होणार असल्याने त्यांच्या पक्षात प्रवेश केल्याची भावना ॲड. आयुब शेख यांनी व्यक्त केली आहे. “
तरी सदर बातमी आपले लोकप्रिय दैनिकातून प्रसिद्ध होण्याची आहे
