Saturday, October 17, 2026
BusinessLatest News

आयपीओसाठी पुण्यातील विशाल निर्मिती लिमिटेडचा सेबीकडे डीआरएचपी दाखल

लिंक: https://www.bseindia.com/corporates/download/363268/IPO%20Prior/DRHP_20251230232534.pdf

पुण्यात मुख्यालय असलेली सिव्हिल इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग आणि कन्स्ट्रक्शन कंपनी, विशाल निर्मिती लिमिटेडने त्यांचे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (SEBI) कडे प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (IPO) साठी दाखल केले आहे. विशाल निर्मिती ही एक स्थापत्य अभियांत्रिकी, उत्पादन आणि बांधकाम कंपनी आहे.

प्रस्तावित आयपीओमध्ये ₹125 कोटी पर्यंतच्या प्रत्येकी ₹10 च्या दर्शनी मूल्याच्या नवीन इक्विटी शेअर्सचा समावेश आहे, तसेच प्रमोटर ग्रुप सेलिंग शेअरहोल्डर असलेल्या वामन प्रीस्ट्रेसिंग कंपनीकडून 15,00,000 पर्यंत इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) देखील समाविष्ट आहे.

कंपनीने यापूर्वी सप्टेंबर 2025 मध्ये सेबीकडे डीआरएचपी दाखल केला होता.

आयपीओमधून मिळणारे निव्वळ उत्पन्न खेळत्या भांडवलाच्या गरजा, सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टे आणि घेतलेल्या मुदत कर्जाच्या अंशतः किंवा पूर्ण परतफेडीसाठी वापरण्याचा प्रस्ताव आहे.

1994 मध्ये स्थापन झालेली आणि अध्यक्ष ब्रिज बी. तापडिया तसेच एका व्यावसायिक व्यवस्थापन संघाच्या नेतृत्वाखालील ही कंपनी प्रामुख्याने रेल्वेसाठी प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट (PSC) स्लीपर्स, प्रीकास्ट आणि प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट उत्पादन, तसेच पंप्ड स्टोरेज प्रकल्पासाठी (PSP) माईल्ड स्टील पाईप्स आणि पेनस्टॉक पाईप्सचे फॅब्रिकेशनच्या कामात गुंतलेली आहे. पायाभूत सुविधा, सिंचन आणि पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांसाठी अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (EPC) या सेवा देखील विशाल निर्मितीद्वारे दिल्या जातात.

पीएससी स्लीपर जे ब्रॉडगेज (बीजी), मीटरगेज (एमजी) आणि स्टँडर्ड गेज रेल्वे लाईन्समध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. ते हाय-टेन्साइल स्टील वायर्स/स्ट्रँड्सने बनवले जातात. ज्या काँक्रीट टाकण्यापूर्वी ताणल्या जातात.

सध्या काम सुरू असलेल्या गुजरातमधील अहमदाबाद ते मुंबईपर्यंतच्या भारतातील पहिल्याच हाय-स्पीड रेल प्रकल्पासाठी, व्हीएनएल ही प्रमुख कंपनी आहे. जी सब काँट्रॅक्टेड कामाच्या व्यवस्थेअंतर्गत, ध्वनिरोधक भिंतींसाठी पूर्वनिर्मित काँक्रीट घटक आणि हाय-स्पीड रेल कॉरिडॉरसाठी केबल डक्ट्सच्या निर्मितीमध्येही सहभागी आहे.

महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, ओडिशा, दिल्ली, पंजाब आणि कर्नाटक यांसारख्या अनेक राज्यांमध्ये काम करण्याची क्षमता या कंपनीकडे आहे. स्वतःच्या मालकीच्या, भाडेतत्त्वावरील आणि जॉब-वर्क सुविधांद्वारे ती कार्यरत आहे आणि भंडू (गुजरात), पृथला (हरियाणा) आणि टिंबा (गुजरात) येथील डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर करारांसह मोठे आणि गुंतागुंतीचे रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्प तिने यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत.

कंपनीच्या ग्राहकांमध्ये सेंट्रल रेल्वे, वेस्ट सेंट्रल रेल्वे, नॉर्दर्न रेल्वे, लार्सन अँड टुब्रो, केईसी इंटरनॅशनल, कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल आणि राज इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट (इंडिया) यांचा समावेश आहे.

गेल्या तीन आर्थिक वर्षांमध्ये व्हीएनएलने सातत्यपूर्ण वाढ आणि सुधारित नफा दर्शवला आहे. कंपनीला कामकाजातून मिळणारा महसूल आर्थिक वर्ष 23मध्ये ₹266.64 कोटी होता, जो आर्थिक वर्ष 24मध्ये कमी होऊन ₹242.88 कोटी झाला आणि आर्थिक वर्ष 25मध्ये वाढून ₹318.52 कोटी झाला. यामुळे कामकाजातील वाढ आणि विस्ताराचे प्रतिबिंब दिसते.

सुधारित परिचालन क्षमता आणि अंमलबजावणीमुळे, करानंतरचा नफा आर्थिक वर्ष 23मधील ₹3.01 कोटींवरून आर्थिक वर्ष 24मध्ये ₹3.45 कोटी आणि त्यानंतर आर्थिक वर्ष 25मध्ये थेट ₹23.64 कोटींपर्यंत वाढला.

30 सप्टेंबर, 2025 रोजी संपलेल्या सहामाहीत, कंपनीने ₹135.24 कोटींचा परिचालन महसूल आणि ₹8.41 कोटींचा कर पश्चात नफा नोंदवला.

कंपनीची दीर्घकाळची यशस्वी कामगिरी, वेगवेगळ्या भौगोलिक क्षेत्रांमध्ये काम करण्याची क्षमता, उत्पादन प्रक्रिया आणि प्रकल्प अंमलबजावणीची परस्परांशी घातलेली सांगड यामुळे खर्चावर चांगले नियंत्रण, वेळेवर वितरण शक्य होते. रेल्वे आणि संबंधित क्षेत्रांमध्ये होणाऱ्या सातत्यपूर्ण सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या माध्यमातून नफा मिळवण्यास कंपनी सज्ज झाली आहे.

प्रीकास्ट स्लीपर्स हे भारतीय रेल्वे पायाभूत सुविधांचा कणा आहेत, जे स्थिरता, समान भार वितरण आणि आधुनिक वेगवान तसेच अवजड वाहतुकीच्या कामकाजाशी सुसंगतता निश्चित करतात. दीर्घायुष्य आणि कमी देखभालीची गरज यामुळे ते भारताच्या प्रचंड रेल्वे मार्ग नूतनीकरण कार्यक्रमांसाठी आदर्श ठरतात.

डीअँडबी अहवालानुसार, सरकारच्या आधुनिकीकरण, विद्युतीकरण आणि रेल्वे जाळ्याच्या विस्तारावरील सातत्यपूर्ण लक्षामुळे भारतीय रेल्वे ही प्रीकास्ट काँक्रीट स्लीपर्सच्या जगातील सर्वात मोठ्या ग्राहकांपैकी एक ठरली आहे. आर्थिक वर्ष 2025मधील 271.4 दशलक्ष युनिट्सवरून आर्थिक वर्ष 2030पर्यंत 323.8 दशलक्ष युनिट्सपर्यंत रेल्वे स्लीपर बाजारपेठ स्थिरपणे वाढण्याची अपेक्षा आहे, जी 3.8%ची चक्रवाढ वार्षिक वाढ दर (CAGR) दर्शवते.

सॅफ्रन कॅपिटल ॲडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड ही या इश्यूची एकमेव बँकर आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading