टाटा AIA ने आपल्या ULIP फंड संचामध्ये मापदंडापेक्षा दिला अधिक चांगला परतावा
टाटा AIA लाईफ इन्शुरन्स आपल्या ULIP फंड्समार्फत इक्विटी आणि हायब्रिड श्रेणींमध्ये सातत्यपूर्ण आणि स्पर्धात्मक, कार्यक्षम परतावे देऊन, मार्केट-लिंक्ड जीवन विमा उपाय सुविधांचे आघाडीचे पुरवठादार म्हणून आपली भूमिका अधिक मजबूत करत आहे.
टाटा AIA फंड्सची कामगिरी :
| गेल्या 5 वर्षातला परतावा* (CAGR) | ||
| टाटा AIA फंड्स | फंड परतावा (%) * | विशिष्ट मापदंड परतावा (%) * |
| मल्टी कॅप फंड | 23.21% | 16.65% |
| टॉप 200 फंड | 24.08% | 16.65% |
| इंडिया कनझम्शन फंड | 23.85% | 16.65% |
*30 नोव्हेंबर, 2025 पर्यतची माहिती. मागील कामगिरी ही भविष्यातील कामगिरीची द्योतक नसते.
फंड मापदंड: मल्टी कॅप फंड, इंडिया कनझम्शन फंड, टॉप 200 फंड: S&P BSE 200.
सुरु झाल्याचा दिनांक: टॉप 200 फंड: 12 जानेवारी 2009, मल्टी कॅप फंड: 05 ऑक्टोबर 2015, इंडिया कनझम्शन फंड: 05 ऑक्टोबर 2015
या फंडांना वैविध्यपूर्ण बाजार विभागांमध्ये मिळणाऱ्या गुंतवणूक संधींचा आणि गुणवत्ता, स्थैर्य आणि दीर्घकालीन उत्पन्न क्षमतेवर भर देणाऱ्या शिस्तबद्ध निवड प्रक्रिया चौकटीचा फायदा होतो.
पोर्टफोलिओ गुणवत्तेसाठी सातत्यपूर्ण मान्यता
टाटा AIA ने जीवन विमा विभागात सर्वाधिक गुणवत्तेच्या गुंतवणूक पोर्टफोलिओंपैकी एक म्हणून आपले स्थान कायम राखले आहे. ऑक्टोबर 2025 पर्यंत त्यांच्या व्यवस्थापनांतर्गत रेटेड मालमत्तांपैकी 95% हून अधिक मालमत्ताना मॉर्निंगस्टार कडून पाच वर्षांच्या आधारावर चार किंवा पाच स्टार रेटिंग मिळाले आहे. हे उद्योगक्षेत्राच्या सुमारे 30% सरासरीपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे. हे टाटा AIA च्या फंड व्यवस्थापन तत्त्वज्ञानातील सातत्य, पारदर्शकता आणि दीर्घकालीन दृष्टिकोन प्रतिबिंबित करते
नुकत्याच सुरू केलेल्या ॲक्टिव्ह फंड्सची मजबूत कामगिरी
टाटा AIA चे नवीन इक्विटी आणि हायब्रिड फंड्स देखील प्रारंभीच्या टप्प्यातच उत्साहवर्धक कामगिरी दर्शवत आहेत:
TATA AIA च्या अलीकडील NFOs ची 30 नोव्हेंबर 2025 पर्यतची कामगिरी
| Fund name | AUM (in Cr.) | Inception date | Returns since launch | Benchmark | Benchmark returns |
| Emerging Opportunities Fund | 2497.82 | 31-Dec-2022 | 27.20% | Nifty Midcap 100 – 95% CRISIL Liquid fund index – 5% | 24.57% |
| Dynamic Advantage Fund | 297.30 | 31-Mar-2023 | 20.69 % | Nifty 50 – 50% CRISIL Composite Bond fund Index – 50% | 12.29% |
| Sustainable Equity Fund | 99.71 | 31-Mar-2023 | 20.32% | Nifty 100 ESG Index | 19.74% |
| Small Cap Discovery Fund | 1852.26 | 24-Jul-2023 | 33.06% | NIFTY Small Cap 100 -100% | 20.19% |
| Flexi Growth Fund | 975.30 | 31-Dec-2023 | 17.57% | Nifty 500 Index | 11.52% |
दीर्घकालीन मूल्य निर्माण करण्याची बांधिलकी
टाटा AIA लाईफ इन्शुरन्सचे मुख्य गुंतवणूक अधिकारी हर्षद पाटील म्हणाले: “आमचे गुंतवणूक धोरण मूलभूत संशोधन, गुणवत्ताधारित निवड आणि दीर्घकालीन मूल्य निर्माण यांवर केंद्रित आहे. व्यापक आर्थिक घटक आणि मजबूत कॉर्पोरेट मूलभूत तत्त्वांद्वारे भारतातील बाजारातील वाढीला चालना मिळत आहे. आमच्या पॉलिसीधारकांच्या हितासाठी जोखीम प्रभावीपणे व्यवस्थापित करताना या संधींचा लाभ घेणारे मजबूत पोर्टफोलिओ तयार करण्यावर आमचा भर आहे.”
गुणवत्ता, वैविध्य आणि संशोधनाधारित गुंतवणूक यांवर सातत्यपूर्ण लक्ष केंद्रित करून, टाटा AIA लाईफ इन्शुरन्स आपल्या ULIP फंड ऑफरिंग्जमार्फत ग्राहक मूल्य वृद्धिंगत करत आहे.
30 नोव्हेंबर 2025 पर्यंत टाटा AIA ने आपली व्यवस्थापनांतर्गत मालमत्ता (AUM) वाढवून 141,607 कोटी रु. इतकी केली आहे. वार्षिक वाढ 20.81% आहे. हे मजबूत स्वतंत्र नवीन व्यवसाय प्रीमियम उत्पन्न आणि उत्कृष्ट गुंतवणूक कामगिरीमुळे शक्य झाले आहे.
*© 2024 Morningstar. सर्व हक्क राखीव. Morningstar हे नाव भारतात आणि इतर न्यायविभागांमध्ये Morningstar, Inc. चे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.
येथे समाविष्ट केलेली माहिती:
(1) Morningstar, Inc. आणि त्याच्या संलग्न कंपन्यांची मालकीची माहिती. त्यात Morningstar India Private Limited (“Morningstar”) यांचा अमर्यादित समावेश आहे; (2) Morningstar यांच्या पूर्वलिखित परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारे, पूर्ण किंवा अंशतः, कॉपी केली जाऊ शकत नाही, पुन्हा वितरित केले जाऊ शकत नाही किंवा वापरली जाऊ शकत नाही; (3) संपूर्ण, अचूक किंवा वेळेवर उपलब्ध असेल याची हमी दिलेली नाही; आणि (4) विविध तारखांना प्रकाशित झालेल्या आणि विविध स्रोतांकडून प्राप्त केलेल्या डेटावर आधारित असू शकते; आणि (5) कोणतीही सिक्युरिटी किंवा इतर गुंतवणूक साधन खरेदी किंवा विक्री करण्याचा प्रस्ताव म्हणून समजला जाणार नाही. Morningstar, Inc., त्याच्या कोणत्याही संलग्न कंपन्या (यामध्ये, मर्यादित नसलेल्या स्वरूपात, Morningstar चा समावेश आहे) किंवा त्यांच्या कोणत्याही अधिकारी, संचालक, कर्मचारी, सहकारी किंवा प्रतिनिधीं पैकी कुणीही येथे दिलेल्या माहितीद्वारे थेट किंवा अप्रत्यक्षरीत्या उद्भवणाऱ्या कोणत्याही ट्रेडिंग निर्णयांसाठी, नुकसानीसाठी किंवा इतर हानीसाठी जबाबदार राहणार नाही.
