AU स्मॉल फायनॅन्स बँकेने रणबीर कपूर आणि रश्मिका मंधानाला आपले ब्रॅंड अम्बॅसडर बनवले
मुंबई : भारताची सर्वात मोठी स्मॉल फायनॅन्स बँक आणि युनिव्हर्सल बँकेत रूपांतरित होण्यासाठी रिझर्व बँकेची सैद्धांतिक मंजुरी मिळवणारी पहिली बँक अशी ख्याती असलेल्या AU स्मॉल फायनॅन्स बँकेने (AU SFB) आज रणबीर कपूर आणि रश्मिका मंधाना या दोन कलाकारांना आपले ब्रॅंड अम्बॅसडर म्हणून नियुक्त केल्याचे घोषित केले आहे. ही भागीदारी शहरी, महानगरी आणि दुरवरच्या बाजारपेठांमध्ये एक पसंतीचा सशक्त राष्ट्रीय बँकिंग ब्रॅंड म्हणून आपली ओळख निर्माण करण्याच्या AU SFB च्या प्रयत्नांना बळकटी देणारी आहे.
रणबीर कपूरचे अष्टपैलूत्व आणि व्यापक लोकप्रियता यामुळे भारतातील लोकांमध्ये आणि खास करून विश्वास आणि विश्वासार्हतेला महत्व देणाऱ्या शहरी व्यावसायिकांमध्ये त्याचा मोठा प्रभाव आहे. दुसरीकडे, रश्मिका मंधाना, चार-चौघींसारखी पण आकर्षक दिसत असल्याने दक्षिण भरतासाहित समस्त देशातील तरुणवर्गाची प्रिय अभिनेत्री आहे. अशाप्रकारे हे दोघे अभिनेते मिळून आकांक्षा, अस्सलपणा आणि प्रादेशिक अपील यांचे संतुलित मिश्रण सादर करतात, जे देशभरातील वेगवेगळ्या समूहातील ग्राहकांशी निगडित होण्याच्या AU SFB च्या महत्त्वाकांक्षेशी सुसंगत आहे.
ही भागीदारी AU SFB च्या बचत खाते आणि चालू खात्यांमधील त्यांच्या मुख्य उत्पादन क्षमतांबाबत ग्राहकांची पसंती बळकट करण्याच्या उद्दिष्टाला पाठबळ देते. ग्राहक सेवेचे उत्कृष्ट तत्त्वज्ञान जपणारी एक मजबूत लायबिलिटीज फ्रँचाईझ म्हणून ठळकपणे नजरेत भरणाऱ्या कथाकथनाद्वारे आणि आजच्या बँकिंगच्या ग्राहकांची पसंती दर्शविणाऱ्या व्यक्तिमत्त्वांच्या माध्यमातून आपल्या ब्रॅंडचा प्रचार-प्रसार करण्याचा बँकेचा उद्देश आहे.
AU SFB या दोन्ही अम्बॅसडर्ससह टेलिव्हिजन, डिजिटल प्लॅटफॉर्म, सोशल मीडिया आणि प्रिंट मीडियामध्ये एक इन्टिग्रेटेड 360-डिग्री मीडिया अभियान सुरू करणार आहे, या अभियानात ग्राहक अनुभव, बँकेच्या उत्पादनांमधील विविधता आणि देशभरात बँकेचा वाढता प्रसार यावर भर देण्यात येईल.
AU स्मॉल फायनॅन्स बँकेचे संस्थापक, MD आणि CEO संजय अग्रवाल म्हणाले, “आम्ही युनिव्हर्सल बँकेत रूपांतरित होण्याच्या प्रक्रियेची तयारी करत असताना आमच्या प्रमुख ऑफरिंग्ज बाबत ग्राहकांचा ओढा वाढविणे अधिकच महत्त्वाचे ठरते. रणबीर आणि रश्मिका देशातील वेगवेगळ्या भागांमधील आणि वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे आम्हाला तरुण व्यावसायिक, उगवते उद्योजक आणि विविध प्रांतांमधील कुटुंबांशी अधिक स्पष्टतेने आणि आत्मविश्वासाने संधान साधण्यास मदत होईल. टेलिव्हिजन, डिजिटल आणि प्रिंट मीडियामधील आमचे आगामी 360-डिग्री अभियान आमच्या उत्पादनांचे सामर्थ्य लोकांपर्यंत पोहोचवेल आणि AU कडून उत्कृष्ट ग्राहक अनुभवाच्या आमच्या वाचनास बळकटी देईल.”
प्रस्तुत भागीदारीविषयी रणबीर कपूर म्हणाला, “माझ्या मते, जे बँकिंग विश्वास, सहजता आणि जीवन सुलभ करणारी उत्पादने यांची सांगड घालू शकते, ते उत्तम बँकिंग असते. ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून देशभरात विकास करताना AU ने खूप लक्षणीय कामगिरी केली आहे. त्यांची उत्पादने दैनंदिन सुविधेचा विचार करून व इनोव्हेशन आणि विश्वास यांच्यातील समतोल साधून तयार करण्यात आली आहेत. देशभरातील अधिकाधिक लोकांपर्यंत एक चांगला ग्राहक अनुभव घेऊन जाण्याच्या प्रक्रियेत AU परिवाराचा भाग होताना मला खूप आनंद होत आहे.”
रश्मिका मंधाना म्हणाली, “चांगले बँकिंग हे निव्वळ व्यवहारांच्या पलीकडे असते; चांगले बँकिंग हे लोकांच्या आर्थिक प्रवासातील विश्वसनीय भागीदार असते. ग्राहक केंद्रितता, इनोव्हेशन आणि आपल्या सर्वसमावेशक दृष्टिकोनासह लक्षावधी लोकांपर्यंत पोहोचण्याकडे AU स्मॉल फायनॅन्स बँकेचा विशेष कल असतो, या गोष्टीने माझे लक्ष वेधून घेतले आणि म्हणूनच मी त्यांच्याशी भागीदारी केली आहे. त्यांनी अलीकडेच लॉन्च केलेले ‘M’ सर्कल अभियान हे महिलांसाठी विचारपूर्ण, उपयुक्त आणि त्यांना सशक्त करणारे असे काहीतरी उभे करण्याचे एक जिवंत उदाहरण आहे. या अभियानामधून एक अशी बँक दिसते,जी ऐकते आणि प्रतिसादही देते. आपली वचनबद्धता आणि ग्राहकांची काळजी घेण्याच्या वृत्तीमधून तरुण भारताशी निगडित झालेल्या AU परिवारात दाखल होताना मी रोमांचित आहे.”
बँकेचा विश्वास आहे की, ही भागीदारी आपल्या ब्रॅंडची संबद्धता वाढवून, महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये पोहोच विस्तारित करून बँकेच्या विकासाच्या या नवीन टप्प्याला गती देईल तसेच, देशभरातील ग्राहकांसाठी पसंतीची बँकिंग पार्टनर बनण्याच्या बँकेच्या महत्त्वाकांक्षेला बळ देईल.
