Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

बेस्ट सेलर ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाच्या नकली प्रती बाजारात; साहित्य क्षेत्राला काळिमा फासणारी घटना

 

 

पोलीस मुख्य सुत्रधारा पर्यंत पोहोचणार का.?

पनवेल : सुप्रसिद्ध लेखक व व्याख्याते, करमाळा तालुक्यातील हिवरे गावाचे रहिवाशी जगदीश ओहोळ यांचे बेस्ट सेलर ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाच्या नकली पुस्तकांची विक्री करणाऱ्या पुस्तक विक्रेत्यास पनवेल खांदा कॉलनी पोलिसांनी सापळा लावून रविवारी सायंकाळी 7:30 वाजता 125 बोगस नकली पुस्तकांसह ताब्यात घेतले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की नवीन पनवेल येथे संविधान महोत्सव सुरू आहे. या संविधान महोत्सवामध्ये सामाजिक कार्यकर्ते महादेव वाघमारे यांनी ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तक प्रत्यक्ष खरेदी केले, शंका आल्याने ते पुस्तक लेखक जगदीश ओहोळ यांना दाखविले, व ते पुस्तक नकली असल्याची खात्री पटल्यानंतर वाघमारे यांनी खांदेश्वर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्मिता ढाकणे यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या सूचना व मार्गदर्शना नुसार पोलीस निरीक्षक शैलेश भद्रे टीमने रविवारी संध्याकाळी सापळा रचून नकली ग्राहक पाठवून छापा टाकला. यावेळी 125 पुस्तके नकली पुस्तके देताना विक्रेता मनमोहन मिश्रा(वय 30 वर्ष, राहणार खांदेश्वर, नवी मुंबई) यास रंगेहात पकडले व ताब्यात घेतले. यावेळी मिश्रा याने ही पुस्तके डुप्लिकेट आहेत हे मला माहित आहे, त्यांची विक्री करतोय असा जबाब दिला.

लेखक जगदीश ओहोळ (वय 36, रा. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सदर कारवाई करण्यात आली. जगदीशब्द पब्लिकेशन पुणे, यांचेकडून हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलेले आहे. सदर पुस्तकाचे निमिर्ती, वितरण व प्रकाशनाचे सर्व हक्क व अधिकार लेखक व जगदीशब्द फाउंडेशन- पब्लिकेशन पुणे यांच्याकडे राखीव आहेत.

कारवाईत नावे मनमोहन मिश्रा त्याचे ताब्यात असलेल्या बॉक्स ची पाहणी केली असता त्यामध्ये “जग बदलणारा बापमाणूस” या पुस्तकाची १२५ (पायरेटेड) डुप्लीकेट पुस्तके मिळून आली असून बाजारात त्याची किंमत ४३,७५०/- रुपये इतकी आहे. यावेळी पंच म्हणून प्रवीण जठार व अनिकेत भंडारे यांनी काम पाहिले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांचे मार्गदर्शनप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक शैलेश भद्रे, पोलीस हेड कॉन्स्टेबल वैभव शिंदे यांच्या टीमने ही कामगिरी केली.
जगदीश ओहोळ यांनी तक्रार दिलेने खांदा कॉलनी शहर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता 2023 नुसार कलम 318, 51 व 63 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन (पायरेटेड ) डूप्लीकेट पुस्तके आणखीन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत त्या पुस्तकाची वितरण, विक्री व छपाई करणारे मूळ सूत्रधाराचा पोलीस कसुन शोध घेत आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शैलेश भद्रे अधिक तपास करत आहेत.

 

‘जग बदलणारा बापमाणूस’ या पुस्तकाच्या डुप्लिकेट(पायरेटेड) नकली प्रती तयार करून विकणे हे एक षडयंत्र असून यात लेखक, प्रकाशक व लाखो वाचकांची फसवणूक केली जात आहे. या पुस्तकाच्या मजकुरात भेसळ करून समाजात कलह निर्माण करून दंगली भडकवल्या जाऊ शकतात. त्यामुळे महाराष्ट्र राज्य गृह मंत्रालय विभाग, पोलीस प्रशासन व सजग वाचक समाजाने या बाबीकडे अधिक गांभीर्याने पाहून नकली पुस्तक बनवणारे, छापणारे व वितरण, विक्री करणारे सर्वांवर कठोरात कठोर कारवाई करावी.

  • जगदीश ओहोळ, (‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाचे लेखक)

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading