Friday, April 3, 2026
Latest NewsPUNE

देवदिवाळीनिमित्त ११ हजार पणत्यांनी उजळले लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर

पुणे :  विविधरंगी फुलांची रंगावली आणि हजारो पणत्यांच्या प्रकाशात बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराचा परिसर उजळून निघाला. फिरत्या सप्तरंगी दिव्यांनी सजलेले मंदिर आणि तेलाच्या ११ हजार दिव्यांची आकर्षक आरास पाहण्याकरिता भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पारंपरिक पद्धतीने करण्यात आलेल्या या दीपोत्सवाने पुणेकरांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.

बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात देवदिवाळीनिमित्त तेलाच्या ११ हजार सप्तरंगी फिरत्या दिव्यांची रोषणाई करण्यात आली. तसेच आकर्षक पुष्परचना साकारुन पारंपरिक पद्धतीने दीपोत्सव करण्यात आला. सुभाष सरपाले व सहका-यांनी ही सजावट केली.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड.रजनी उकरंडे, कोषाध्यक्ष युवराज गाडवे, उत्सव प्रमुख महेंद्र पिसाळ, उप उत्सव प्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, डॉ. पराग काळकर, सुनिल रुकारी, राजेंद्र बलकवडे आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, ऐहिक दिवाळी झाल्यावर देवदीवाळी पासून सुरू होणाऱ्या मार्गशीर्ष महिन्याच्या प्रारंभापासून मार्तंड भैरव षडरात्रोसवाचे आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दत्त मंदिरातर्फे हा दीपोत्सव प्रकर्षाने साजरा करण्यात येतो. त्यानुसार दरवर्षीप्रमाणे यंदाही देव दिवाळीनिमित्त मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. मंदिराचे प्रवेशद्वार व गाभारा फुलांच्या माळांनी तसेच रांगोळीने सजविण्यात आले. तसेच कळसावर संपूर्णपणे रंगीबेरंगी दिव्यांची आकर्षक सजावट करण्यात आली. मंदिरात अनेक प्रकारच्या समई व दिवे पाहण्यासोबतच दत्तमंदिरातील दीपोत्सवाचे मोबाईलमध्ये दृश्य कैद करण्याकरीता भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading