Wednesday, April 1, 2026
Latest NewsPUNE

जन्मदोष ओळख व जेनेटिक काऊन्सेलिंगवर हॅण्ड्स-ऑन कार्यशाळा संपन्न

पुणे डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजहॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरपिंपरीपुणे येथील बालरोग विभागाने दोन दिवसांची हॅण्ड्स-ऑन कार्यशाळा यशस्वीपणे आयोजित केली होती. या कार्यशाळेचा विषय मेडिकल जेनेटिक्सबर्थ डिफेक्ट ओळख व जेनेटिक काऊन्सेलिंग स्ट्रॅटेजीज असा होता. या कार्यक्रमाला भारत सरकारच्या आरोग्य संशोधन विभाग (DHR) – इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR), नवी दिल्ली यांचे सहकार्य लाभले होते. या कार्यशाळेसाठीचा निधी डॉ. प्रमिला मेनन आणि डॉ. स्नेहा सागरकर यांना आरोग्य संशोधन विभाग (DHR) – ICMR कडून प्रदान करण्यात आला होता.

जन्मजात दोष हे जागतिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर आव्हान राहिले असूनत्यातून मोठ्या प्रमाणावर आजारपण व मृत्यूची शक्यता निर्माण होत होती. तपासणीलवकर निदान आणि वेळेवर उपचार ही प्रतिबंधाची सर्वाधिक प्रभावी साधने असल्याचे अधोरेखित करण्यात आले. या कार्यशाळेत या सर्व प्रतिबंधात्मक उपायांवर भर देण्यात आला होताज्यामुळे समुदायामध्ये आनुवंशिक आजारांचा बोजा कमी करण्याचा उद्देश साधला गेला.

कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राला मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती लाभली होती. यामध्ये प्रमुख अतिथी डॉ. श्राबनी मुखर्जीसायंटिस्ट G, ICMR–NIRRCH, मुंबईतसेच डॉ. मंदाकिनी प्रधानप्राध्यापक व विभागप्रमुख – मातृत्व व प्रजनन आरोग्य विभाग, SGPGIMS, लखनऊ यांचा समावेश होता. मुख्य अतिथी म्हणून डॉ. एन. जे. पवारकुलगुरूडॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठपुणे उपस्थित होते.

डॉ. श्राबनी मुखर्जी यांनी ICMR च्या वैद्यकीय संशोधनातील योगदानावर प्रकाश टाकत भारतात आनुवंशिक संशोधनाची वाढती गरज स्पष्ट केली होती. डॉ. एन. जे. पवार यांनी जेनेटिक्स क्षेत्रातील सहयोगी संशोधन प्रकल्पांचे महत्त्व अधोरेखित केले होते. त्यानंतर डॉ. ए. रेखाअधिष्ठाता यांनी मनोगत व्यक्त केले होतेतसेच डॉ. पी. वत्सलास्वामीडायरेक्टर अकॅडेमिक्स यांनीही जीनशास्त्रावरील प्रभावी विवेचन केले होते.

कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक व विभागप्रमुखबालरोग विभाग डॉ. शैलजा मानेडायरेक्टर ऑफ रिसर्च डॉ. श्रीकांत त्रिपाठी आणि ॲनॅटॉमी विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. प्रीती सौंजेयांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यशाळेचे नेतृत्व डॉ. प्रमिला मेननप्राध्यापक व जेनेटिक क्लिनिक प्रमुख यांनी केले होते. त्यांनी उद्घाटनपर भाषण केले होते. तसेच डॉ. स्नेहा सागरकररिसर्च विभागयांनी वैज्ञानिक सत्रे आणि हॅण्ड्स-ऑन प्रशिक्षणाचे समन्वयक म्हणून काम पाहिले होते.

भारतभरातील ICMR संस्थांमधील तसेच विविध राज्यांतील – महाराष्ट्रकेरळआसाम आणि तिरुवनंतपुरम – वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापकपीएच.डी. संशोधक आणि पदव्युत्तर विद्यार्थी असे एकूण ४४ हून अधिक प्रतिनिधी या कार्यशाळेत सहभागी झाले होते.

वैज्ञानिक कार्यक्रमात मेडिकल जेनेटिक्सजीनोमिक डायग्नॉस्टिक्सप्रिनेटल व रिप्रोडक्टिव जेनेटिक्सकाऊन्सेलिंग तंत्रे तसेच मॉलिक्युलर आणि साइटोजेनेटिक पद्धतींवरील प्रात्यक्षिक प्रशिक्षण अशा व्यापक विषयांचा समावेश केला 

गेला होता. केस डिस्कशनगटक्रियाकलाप आणि संवादात्मक कार्यशाळांमुळे सहभागींच्या ज्ञानवृद्धीसह नेटवर्किंग आणि आयडिया एक्स्चेंजची संधी मिळाली होती. कार्यशाळेत आनुवंशिक निदान व काऊन्सेलिंगमधील नैतिक मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली होती तसेच भविष्यातील संशोधन सहकार्याचे मार्गही शोधण्यात आले होते.

डॉडीवायपाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ)पिंपरीपुणे येथील प्रकुलपती माननीय डॉभाग्यश्री पीपाटील, म्हणाल्याही कार्यशाळा संशोधननवकल्पना आणि संवेदनाशील आरोग्यसेवा यांचे एकत्रीकरण करण्याच्या आमच्या संस्थेच्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब ठरलीडॉक्टर आणि संशोधकांना जेनेटिक साक्षरता प्रदान करून आम्ही प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि आनुवंशिक आजारांच्या लवकर हस्तक्षेपाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले.”

डॉडीवाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरीपुणे यांचे विश्वस्त  खजिनदार माननीय डॉयशराज पीपाटील यांनी सांगितले डॉडीवायपाटील विद्यापीठात आम्ही बहुविषयक सहकार्याला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांना नेहमीच ठामपणे पाठिंबा दिला आहेही कार्यशाळा वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन एकत्रित येऊन रुग्णसेवा  सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात कसा परिवर्तनकारी प्रभाव निर्माण करू शकतातयाचे उत्तम उदाहरण ठरली.”

डॉडीवायपाटील मेडिकल कॉलेजहॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरपिंपरीपुणे चे अधिष्ठाता डॉरेखा अर्कोटयांनी सांगितले, या कार्यशाळेने शैक्षणिक शिक्षण आणि क्लिनिकल प्रॅक्टिस यांतील दरी प्रभावीपणे भरून काढली आणि वैद्यकीय व्यावसायिकांना जेनेटिक्सचे ज्ञान प्रत्यक्ष आरोग्यसेवेत लागू करण्यास तसेच त्यांच्या निदान  संशोधन कौशल्यांचा अधिक विकास करण्यास सक्षम बनवले.”

डॉडीवायपाटील मेडिकल कॉलेजहॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरपिंपरीपुणे चे डायरेक्टर अकॅडेमिक्स डॉपीवत्सलास्वामीयांनी सांगितलेजेनेटिक्स हे पर्सनलाइज्ड मेडिसिनचे भविष्य आहेया कार्यशाळेदरम्यान दिलेल्या हॅण्ड्सऑन प्रशिक्षणामुळे सहभागीांना मॉलिक्युलर सायन्स आणि क्लिनिकल केअर यांतील दरी भरून काढण्यास सक्षम झाले.”

डॉडीवायपाटील मेडिकल कॉलेजहॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरपिंपरीपुणे च्या प्राध्यापक  विभागप्रमुखबालरोग विभाग डॉशैलजा मानेम्हणाल्याया कार्यशाळेद्वारे आम्ही आरोग्यसेवा व्यावसायिकांमध्ये जागरूकताकौशल्य आणि सहकार्याची भावना विकसित करण्याचा प्रयत्न केलाक्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये जेनेटिक्सचा समावेश करणे हे जन्मजात दोषांचे लवकर निदानप्रतिबंध आणि सुधारित व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.”

या कार्यशाळेमुळे आरोग्यसेवा व्यावसायिकांना विविध आनुवंशिक जन्मदोष आणि बालकांमधील दुर्मीळ आजारांविषयी सखोल समज प्राप्त झालीतसेच पालकांना योग्य मार्गदर्शनमाहितीपूर्ण काऊन्सेलिंग आणि प्रभावित मुलांचे अधिक सहानुभूतीपूर्वक  कुशल हाताळणी करण्याची क्षमता विकसित झाली.

डॉडीवायपाटील मेडिकल कॉलेजहॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या बालरोग विभागात अत्याधुनिक जेनेटिक क्लिनिक उपलब्ध असून येथे सर्वसमावेशक आनुवंशिक तपासणी  काऊन्सेलिंग सेवा दिल्या जातातप्रत्येक मंगळवारी सकाळी .०० ते सायंकाळी .०० या वेळेत तज्ञ डॉक्टर पालक  मुलांसाठी उपलब्ध असून गर्भधारणा पूर्वी  दरम्यान योग्य मार्गदर्शनलवकर निदानप्रतिबंध आणि आनुवंशिक आजारांचे व्यवस्थापन यासाठी मदत करतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading