वसंतदादा पाटील यांच्या जयंती दिनी काँग्रेसच्या वतीने आदरांजली अर्पण.
पुणे : पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, सहकार क्षेत्राला एक वेगळे, निर्णायक वळण देऊन विकास साधणारे नेते, क्रांतिकारक व स्वांतत्र्य सैनिक स्व. वसंतदादा पाटील यांच्या जयंती दिनी आज काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजित दरेकर व पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा सौ. प्राची दुधाने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. यावेळी अजित दरेकर, सौ. प्राची दुधाने यांच्या समवेत राजेंद्र भुतडा, राज अंबिके, संदिप मोरे, भगवान कडू, अभिजीत महामुनी, दिलीप लोळगे, सुरेश नांगरे, मंगेश भोसले, राहुल भोसले आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
