Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

अरविंद एज्युकेशन सोसायटीमध्ये सांस्कृतिक वारसा जपत कीर्तनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

 

पिंपरी, प्रतिनिधी :
आज विद्यार्थी, तसेच तरुण पिढी मानसिक तणावातून जात आहे. त्यामुळे त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी अध्यात्माची फुंकर मारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कीर्तनकार ह .भ. प. जयेश महाराज भाग्यवंत यांनी केले.
जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या वतीने कीर्तनकार ह .भ. प. जयेश महाराज भाग्यवंत यांच्या कीर्तन सेवेचे आयोजन केले होते. त्यांनी इंग्लिशमधून कीर्तनसेवा दिली. ह.भ.प. उद्धव महाराज गोळे, ह.भ.प. सोमनाथ पाडाळे यांची त्यांना साथ लाभली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, ह. भ. प. संजय देवरे, ह. भ. प. गहिनीनाथ कळमकर, ह.भ.प. अर्जुन गांधिले, सौरभ शिंदे, सांगवी ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जयेश महाराज भाग्यवंत यांनी विद्यार्थ्यांना संत तुकाराम महाराजांच्या विविध अभंगांच्या माध्यमातून शिक्षण व संस्कारांचे महत्त्व पटवून देत त्यांच्यामध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अध्यात्म, विवेकवाद व विज्ञान यांची सांगड घातली. या कलियुगात मनुष्याला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल, तर भगवंताच्या नामस्मरणाशिवाय दुसरा सोपा मार्ग नाही. संतांचे विचार आणि त्यांनी दाखवलेला मनुष्यजन्माच्या उद्धाराचा मार्ग त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितला.
या कार्यक्रमाला या कीर्तन सोहळ्यास सौरभ शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले. सूत्रसंचालन अश्विनी शिसोदे यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading