Sunday, September 13, 2026
Latest NewsPUNE

सुदर्शन होम आणि श्री भैरव अष्टोत्तरशतनामावलीने श्री काळभैरवनाथ जन्माष्टमी उत्सवाला प्रारंभ

पुणे : कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ जन्माष्टमी उत्सवाला श्री भैरव अष्टोत्तर शतनामावली आणि सुदर्शन होम याने प्रारंभ झाला. श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर कसबा पेठ तर्फे श्री काळभैरवनाथ जयंती (जन्माष्टमी) निमित्त उत्सव आयोजित करण्यात आला आहे.

यानिमित्ताने मंदिराला नयमरम्य सजावट करण्यात आली असून आकर्षक पुष्पसजावट देखील साकारण्यात आली आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी आरती, दुपारी श्री भैरव अष्टोत्तरशतनामावली आणि सायंकाळी सुदर्शन होम झाला. याशिवाय उत्सवात गण होम, श्री भैरव अष्टोत्तरशतनामावली, दुर्गा पूजा व आरती होणार आहे.

मुख्य जन्मसोहळ्याच्या दिवशी बुधवारी (दि.१२) सकाळी ६.३० वाजता लघुरुद्र होणार आहे. दुपारी १२ वाजता श्री भैरव अष्टोत्तर शत नामावली, आरती, रात्री ९ वाजता रुद्र अभिषेक आणि रात्री १२ वाजता मुख्य जन्मसोहळा महाआरती होईल.

कसबे पुणे ही बाराशे वर्षांपूवीर्ची पुण्यातील वस्ती. गाव तेथे मारुती आणि भैरवनाथाचे मंदिर ही आपल्याकडील परंपरा आहे. श्री काळभैरवनाथ हे पुण्याचे जागृत ग्रामदैवत आहे. भैरवनाथ मंदिराचे गर्भगृह आणि मध्यगृह हेमाडपंथी बांधणीचे आहे. मंदिराचे व्यवस्थापन लडकत घराण्याकडे असून वर्षभरात विविध उत्सव केले जातात. भाविकांनी उत्सवात मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading