Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRA

शिवसेनेचे आंदोलन यशस्वी, भांडुपकरांच्या सेवेत नविन बसेस

 

मुंबई – शिवसेना स्टाईलने केलेल्या आंदोलनामुळे बेस्ट प्रशासनाने बंद केलेल्या सर्व बसेस पुर्ववत चालू केल्या असून त्यात आणखीन बसेसची संख्या वाढविण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. बसेस पुर्ववत कराव्या म्हणुन ठाकरे गटाच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख रमेश कोरगावकर तसेच युवासेना कार्यकारणी सदस्य राजोल संजय पाटील व असंख्य शिवसैनिकांनी बेस्ट प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात आंदोलन केले होते.

भांडुप स्टेशन परिसरामध्ये असलेल्या बस मार्ग क्रमांक ६०५, ६०६, ६०८ व ६१२ यापैकी ६०८, ६१२ या मार्गावरची बस वाहतूक पूर्णता बंद करण्यात आली होती. तर ६०५ व ६०६ या मार्गावरची बस वाहतूक १ नोव्हेंबर पासून बंद करण्याच्या मार्गावर होते. तर ६०७ क्रमांकाची बस तुळशेत पाडा पर्यंत जात होती. तिला शिवाजी तलाव ते भांडुप स्टेशन असा मार्गात बदल करण्यात आला होता. त्यामुळे ६०८, ६१२ व ६०७ बसने प्रवास करणा-या प्रवाशांच्या त्रासात वाढ झाली होती. प्रवाशांना जादा भाडे देऊन रिक्षाने प्रवास करावा लागत होता. या विरोधात नागरीकांनी केलेल्या तक्रारीवर भांडुप रेल्वे स्थानकाबाहेर जोरदार आंदोलन करण्यात आले. त्यामुळे बेस्ट प्रशासनाला नमते घ्यावे लागले. त्यांनी भांडुपकरांच्या मागणी नुसार बेस्ट बसच्या संख्येत वाढ केली असून बंद करण्यात आलेल्या सर्व मार्गावरील बसेस पुर्ववत करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading