Friday, April 3, 2026
Latest NewsSports

‌पीवायसी हिंदू जिमखाना वॉरीयर्स, डेक्कन जिमखाना मॉन्स्टर्स, पुना क्लब किंग्ज्‌‍, पुना क्लब मॅजिशियन्स्‌‍ संघांनी उद्घाटनाचा दिवस गाजवला !

‌‘पुणे क्यु स्पोर्ट्‌‍स प्रीमिअर लीग‌’ आंतर क्लब स्नुकर स्पर्धा !!



पुणे :  रॉयल कनॉट बोट क्लब (आरसीबीसी) यांच्यावतीने आयोजित ‌‘पुणे क्यु स्पोर्ट्‌‍स प्रीमिअर लीग‌’ आंतर क्लब स्नुकर स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना वॉरीयर्स, डेक्कन जिमखाना मॉन्स्टर्स, पुना क्लब किंग्ज्‌‍ आणि पुना क्लब मॅजिशियन्स्‌‍ या संघांनी प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून उद्घाटनाचा दिवस गाजवला.

रॉयल कनॉट बोट क्लब (आरसीबीसी), पुना क्लब, पीवायसी हिंदू जिमखाना आणि डेक्कन जिमखाना क्लब स्नुकर सभागृह येथे स्पर्धेच्या अ गटाचे सामने ‌‘होम‌’ आणि ‌‘अवे‌’ या पद्धतीने झाले. पीवायसी वॉरीयर्स संघाने पुना क्लब क्यु माफिया संघाचा ३-१ असा पराभव केला. सामन्याच्या एकेरीमध्ये निमिश कुलकर्णी याने क्रीश रगानी याचा ११३-११० असा पराभव केला. दुहेरीच्या सामन्यात पुना क्लबच्या अश्रफ परवानी आणि अनिकेत संघवी या जोडीने पीवायसी जिमखानाच्या आदित्य देशपांडे आणि निशाद चौगुले या जोडीचा ७०-६० असा पराभव करून सामन्यात १-१ अशी बरोबरी गाठली. त्यानंतर पीवायसीचया राजवर्धन जोशी याने सुनिल आशर याचा ५३-३७ असा आणि आनंद आपटे याने पुना क्लबच्या संजय दिड्डी याचा १११-९७ असा पराभव करून पीवायसी संघाला ३-१ असा विजय मिळवून दिला.

या गटाच्या दुसऱ्या सामन्यामध्ये डेक्कन जिमखाना मॉन्स्टर्स संघाने आरसीबीसी रॉकेट्स संघाचा ३-० असा सहज पराभव केला. या विजयामध्ये सुनिल अलगुडे, राजेंद्र आढाव, यश देशपांडे आणि सचिन बिचे यांची कामगिरी महत्वपूर्ण ठरली. ब गटाच्या सामन्यामध्ये पुना क्लब किंग्ज्‌‍ संघाने आरसीबीसी डॉमिनर्स संघाचा ३-१ असा पराभव करून शानसार सुरूवात केली. पुना क्लब किंग्ज्‌‍कडून प्रशांत आर. आणि सनथ परमार यांनी प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव केला.

चुरशीच्या झालेल्या सामन्यामध्ये पुना क्लब मॅजिशियन्स्‌‍ संघाने पीवायसी जायंट्स संघाचा ३-२ असा पराभव केला. पुना क्लबच्या विग्नेश संघवी याने एकेरीमध्ये रोहीत नारगोलकर याचा ६६-३४ असा पराभव केला. योगेश लोहीया याने पुना क्लबच्या सुरज राठी याचा ५९-५५ असा पराभव करून सामन्यात १-१ अशी बरोबरी निर्माण केली. दुहेरीमध्ये पुना क्लबच्या कपिल पंजाबी आणि दिनेश महातनी यांनी अशोक शेट्टी व विशाल मल्होत्रा याचा ७७-४२ असा पराभव केला. पीवायसीच्या योगेश याने विग्नेश संघवी याचा ४९-१२ असा पराभव करून २-२ अशी बरोबरी निर्माण केली. अंतिम एकेरीच्या सामन्यात सुरज राठी याने रोहीत नारगोलकर याचा ११३-४३ असा पराभव करून सामन्यात विजय संपादन केला.

याआधी स्पर्धेचे उद्घाटन रॉयल कनॉट बोट क्लबचे (आरसीबीसी) क्रिडा अध्यक्ष परवेझ सौदागर, आरसीबीसीचे मानद सचिव जितेश पटोडीया आणि करमणूक विभागाच्या अध्यक्षा पुजा शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. संयोजन समितीचे ऋषी रामय्या यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

स्पर्धेचा निकालः गट अः गटसाखळी फेरीः
पीवायसी वॉरीयर्स वि.वि. पुना क्लब क्यु माफिया ३-१ (निमिश कुलकर्णी वि.वि. क्रीश रगानी ११३-११०; आदित्य देशपांडे/ निशाद चौगुले पराभूत वि. अश्रफ परवानी/अनिकेत संघवी ६०-७०; राजवर्धन जोशी वि.वि. सुनिल आशर ५३-३७; आनंद आपटे वि.वि. संजय दिड्डी १११-९७);

डेक्कन जिमखाना मॉन्स्टर्स वि.वि. आरसीबीसी रॉकेट्स ३-० (सुनिल अलगुडे/राजेंद्र आढाव वि.वि. आकाश भाटीया/आशिष पटेल ६२-५८; यश देशपांडे वि.वि. झहीर लोखंडवाला ५०-४१; सचिन बिचे वि.वि. वेदांत दोशी ११०-९६);

ब गटः
पुना क्लब किंग्ज्‌‍ वि.वि. आरसीबीसी डॉमिनर्स ३-१ (प्रशांत आर. वि.वि. प्रतिक वाढवा १०७-८४; पंकज परमार/कुणाल वासवानी पराभूत वि. रॉबिन पॉल/क्वरीश उमरेठी ६८-९७; सनथ परमार वि.वि. जितेश पटोडीया ६४-६०; प्रशांत आर. वि.वि. पंकज जगसिया ११३-१०३);

पुना क्लब मॅजिशियन्स्‌‍ वि.वि. पीवायसी जायंट्स ३-२ (विग्नेश संघवी वि.वि. रोहीत नारगोलकर ६६-३४; सुरज राठी पराभूत वि. योगेश लोहीया ५५-५९; कपिल पंजाबी/दिनेश महातनी वि.वि. अशोक शेट्टी/विशाल मल्होत्रा ७७-४२; विग्नेश संघवी पराभूत वि. योगेश लोहीया १२-४९; सुरज राठी वि.वि. रोहीत नारगोलकर ११३-४३);

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading