Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

विश्रांतवाडी पोलीस स्टेशन आयोजित “रन फॉर युनिटी मॅरेथॉन- एकता दौड” ला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

पुणे : शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत विश्रांतवाडी पोलीस ठाणे यांच्या वतीने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्त आयोजित ” रन फॉर युनिटी मॅरेथॉन -दौड” स्पर्धेला शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच नागरिक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश हांडे यांच्या हस्ते झेंडा दाखवून मॅरेथॉनला सुरुवात करण्यात आली.

विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथून सुरू झालेली मॅरेथॉन दौड हि पामगार्डन मार्गे सर्विस रस्त्याने आळंदी रोड,दत्त मंदिर येथून साप्रस पोलीस चौकी मार्गे डॉ. आंबेडकर सोसायटी बीआरटी बस स्टॉप येथून पुढे चंद्रमा चौकापर्यंत जाऊन पुन्हा डेक्कन कॉलेज रस्त्याने डॉ. आंबेडकर सोसायटी चौक येथून आरटीओ कॉर्नर मार्गे सर्विस रस्त्याने विश्रांतवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी समारोप करण्यात आला. पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 सोमय मुंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त चतुर्शिंगी विभाग विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली या युनिटी मॅरेथॉन मध्ये इमॅन्युअल मार्थोमा स्कूल टिंगरे नगर विश्रांतवाडी,लोकमान्य टिळक स्कूल खडकी, न्यूरॉन लॅब स्कूल धानोरी, सेंट पीटर स्कूल धानोरी, डॉ. मारतो फिलिस स्कूल धानोरी या पाच शाळा व आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज यांचे एकूण चारशे विद्यार्थी तसेच नागरिक व विश्रांतवाडी पोलीस स्टेशन कडील अधिकारी,अंमलदार असे एकूण पाचशे पेक्षा अधिक सहभागींनी मॅरेथॉन रनमध्ये सहभाग घेतला.

मॅरेथॉन रन यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे संगीताच्या तालावर ठेका धरला होता. सर्व सहभागींसाठी पिण्याचे पाणी,चहापान व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. विश्रांतवाडी पोलीस स्टेशन यांच्या वतीने आयोजित हि मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहभागी सर्व शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी,शिक्षक, मुख्याध्यापक यांच्यासह निर्भय प्रतिष्ठान ट्रस्ट व साप्रस मिनी मॅरेथॉन यांचे स्वयंसेवक, केदारनाथ हॉस्पिटल यांच्याकडून डॉक्टर व स्टाफसह रुग्णवाहिका तसेच आदर पूनावाला क्लीन सिटी यांचे सफाई सेवक या सर्वांचे बहुमोल सहकार्य लाभले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading