Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राष्ट्रीय एकता दिवस आणि राष्ट्रीय संकल्प दिवस संपन्न

 

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा पुण्यतिथीदिन ‘राष्ट्रीय संकल्प दिवस’ म्हणून व देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा जयंतीदिन ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून संपन्न झाला.

यानिमित्त विद्यापीठाच्या सरस्वती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात मा. कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे, वित्त व लेखाधिकारी सीएमए चारुशीला गायके यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहीली.

यावेळी विभागप्रमुख व संचालक प्रा. डॉ. विलास आढाव यांनी राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. याप्रसंगी विद्यावाणीचे संचालक श्रीदत्त गायकवाड, निर्माता महेश जगताप, सहायक कुलसचिव डॉ अजय ठुबे, शिवाजी उतेकर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading