Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

लिंगायत स्मशानभूमीत ‘एक दिवा पूर्वजांसाठी’

पुणे : लिंगायत सेवा मंडळ व वीरशैव लिंगायत समाज बांधव पुणे शहर च्या वतीने टिंबर मार्केट जवळ असलेल्या लिंगायत स्मशानभूमी जानाई मळा या स्मशानभूमीमध्ये पूर्वजांच्या स्मरणार्थ एक दिवा लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. पुणे महानगरपालिकेकडून ४० वर्षां पूर्वी लिंगायत सेवा मंडळ या संस्थेला व्यवस्थापन म्हणून देण्यात आलेले आहे . लिंगायत सेवा मंडळ या संस्थेला यावर्षी ७५ वर्षे  पूर्ण होत आहेत.
यावेळी लिंगायत सेवा मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय वायचळ, उपाध्यक्ष किरण मेणकर ,चिटणीस अरुण मिटकरी, खजिनदार नरेंद्र सोलापुरे, सदस्य संतोष बनाळे व श्रीयुत नायकू आणि त्यांचे कार्यकर्ते व संस्थेचे पदाधिकारी, इतर समाज उपस्थित होता. यावेळी समाजातील लोकांनी आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ एक दिवा लावून दीपोत्सव साजरा केला.
मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय वायचळ म्हणाले, संस्थेकडून दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो. पुणे शहरातील ही अतिशय सुंदर सर्व सोयी असलेली स्मशानभूमी असून, महानगरपालिका आणि लिंगायत सेवा मंडळ या दोघांच्या संयुक्तिक पद्धतीने स्मशानभूमीचे नियोजन केले जाते. हा एक स्तुत्य उपक्रम आहे. ही संस्था पुणे शहरांमध्ये मुलांचे आणि मुलींचे वसतिगृह देखील चालवते.
विविध भागातील स्मशानभूमीचे व्यवस्थापन संस्थांना द्यावे
लिंगायत लोकांच्या मागणीनुसार पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये असलेल्या स्मशानभूमी सुद्धा त्या त्या ठिकाणच्या संस्थांना व्यवस्थापन करण्यास देण्यात यावे. जेणेकरून सामाजिक बांधिलकी आणि महानगरपालिकेची बांधिलकी एकत्रितरित्या जोपासली जाईल, अशी मागणी यावेळी समाजबांधवांकडून करण्यात आली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading