Wednesday, June 3, 2026
BusinessLatest News

ऍक्सिस म्युच्युअल फंडचा नवा ऍक्सिस इन्कम प्लस आर्बिट्राज पॅसिव्ह एफओएफ

मुंबई:  भारतातील एक प्रमुख संपत्ती व्यवस्थापन कंपनी, ऍक्सिस म्युच्युअल फंडने नवीन ऍक्सिस इन्कम प्लस आर्बिट्राज पॅसिव्ह एफओएफ सुरु केल्याची घोषणा आज केली. ही एक नाविन्यपूर्ण ओपन एंडेड योजना आहे. या योजनेचा उद्देश गुंतवणूकदारांना असा गुंतवणूक पर्याय देणे आहे, जो सुरक्षित असेल, ज्यामध्ये परताव्याचे अनुमान लावले जाईल आणि कराचे ओझे देखील कमी असेल. नवीन फंड ऑफर (एनएफओ) २८ ऑक्टोबर २०२५ ला सबस्क्रिप्शनसाठी खुली होईल आणि ११ नोव्हेंबर २०२५ पर्यंत राहील. या फंडचे व्यवस्थापन करतील – देवांग शाह (फिक्स्ड इन्कम विभागाचे प्रमुख), आदित्य पगारिया (सिनियर फंड मॅनेजर), हार्दिक सतारा (सिनियर फंड मॅनेजर) आणि कार्तिक कुमार (फंड मॅनेजर).

 

नवी गुंतवणूक योजना अशा गुंतवणूकदारांसाठी तयार करण्यात आली आहे ज्यांना कमी जोखीम (कॉन्झर्वेटिव्ह रिस्क प्रोफाइल) आणि कर भरणा केल्यानंतरचा नफा अधिक जास्त हवा असतो. हा फंड डेटवर आधारित पॅसिव्ह म्युच्युअल फंड योजना आणि आर्बिट्राज फंडांमध्ये धोरणात्मकदृष्ट्या गुंतवणूक करून एक हायब्रीड गुंतवणूक साचा तयार करतो, ज्याचे उद्दिष्ट मध्यम कालावधीमध्ये (काही वर्षात) नियमित परतावा देणे हे आहे.

ऍक्सिस एएमसीचे एमडी आणि सीईओ, श्री बी गोपकुमार यांनी सांगितले, “ऍक्सिस म्युच्युअल फंडामध्ये आम्ही नेहमीच अशा नवीन आणि गुंतवणूकदारांवर केंद्रित योजना देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे ज्यांची कामगिरी चांगली असेल, आणि ज्या समजून घेणे सोपे देखील असेल. ऍक्सिस इन्कम प्लस आर्बिट्राज पॅसिव्ह एफओएफ याच विचारातून तयार करण्यात आला आहे. हा फंड स्थिरता, पारदर्शकता आणि कर बचत यांचा अनोखा मिलाप प्रदान करतो. आजच्या काळात बाजारपेठेमध्ये भविष्याचे अनुमान लावणे आणि करपश्चात नफा यांचे महत्त्व वाढले आहे, हा फंड गुंतवणूकदारांना निश्चित उत्पन्न देणाऱ्या गुंतवणुकीसाठी एक अधिक स्मार्ट मार्ग मिळवून देण्यासाठी डिझाईन करण्यात आला आहे.”

 

ऍक्सिस इन्कम प्लस आर्बिट्राज पॅसिव्ह एफओएफची प्रमुख वैशिष्ट्ये

ही योजना आपल्या पोर्टफोलिओपैकी जवळपास ५०-६५% भाग पॅसिव्ह डेट ओरिएंटेड म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवेल, ज्यांचे उद्दिष्ट उच्च गुणवत्तेच्या म्हणजेच सुरक्षित गुंतवणूक योजना आहेत. अंतर्निहित योजना रोल-डाउन स्ट्रॅटेजीचे पालन करतील, ज्यामुळे गुंतवणूकदारांना व्याजदराचा धोका कमी करून मिळणाऱ्या उत्पन्नाचा लाभ घेता येईल. पोर्टफोलिओचा उर्वरित ३५-५०% हिस्सा आर्बिट्राज फंडांमध्ये गुंतवला जातो, ज्यामध्ये पूर्णपणे हेज्ड (कव्हर केलेल्या) इक्विटी पोझिशन्सचा समावेश होतो. हा भाग कमीत कमी अस्थिरतेसह परतावा मिळवण्यासाठी डिझाइन केला आहे, कारण तो बाजाराच्या दिशेवर अवलंबून नाही. या दोन्ही घटकांच्या मिश्रणामुळे, फंड डेट इन्स्ट्रुमेंट्सप्रमाणेच स्थिर परतावा देतो, पण यात कर लाभ अधिक असतो.

हा फंड त्याच्या कामगिरीचे मोजमाप करण्यासाठी दोन निर्देशांकांचा वापर करतो, ज्यामध्ये ६५% निफ्टी शॉर्ट ड्युरेशन डेट इंडेक्स आणि ३५% निफ्टी ५० आर्बिट्राज टीआरआय (TRI) चा समावेश आहे, जे त्याच्या दुहेरी गुंतवणुकीला दर्शवते. या फंडमध्ये तुम्हाला उच्च तरलता (हाय लिक्विडिटी) मिळते, ज्यामध्ये T+2 रिडेम्पशन पेआउट आणि कोणताही एक्झिट लोड नाही. यामुळे, गुंतवणूकदारांना जलद आणि कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय पैसे काढण्याची सोय मिळते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अंतर्निहित योजनांना पुनर्संतुलित करताना (रीबॅलन्स), गुंतवणूकदाराला कोणताही कर भरावा लागत नाही, त्यामुळे याची कर बचत क्षमता वाढते.

ऍक्सिस इन्कम प्लस आर्बिट्राज पॅसिव्ह एफओएफमध्ये गुंतवणूक का करावी:

हा फंड अशा सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी आहे ज्यांना असा गुंतवणूक पर्याय हवा आहे ज्यात जास्त जोखीम नसते, जो स्थिर परताव्याच्या शोधात असलेल्या गुंतवणूकदारांसाठी योग्य आहे, आणि ज्याचे उद्दिष्ट मध्यम कालावधीत (काही वर्षांसाठी) सातत्यपूर्ण व स्थिर परतावा देणे आहे, उदा. कॉर्पोरेट्स, जास्त गुंतवणूक करणारे व्यक्ती आणि सामान्य किंवा लहान गुंतवणूकदार. फंडाचा जो भाग डेट इन्स्ट्रुमेंट्समध्ये (जसे की बॉण्ड्स) गुंतवणूक करतो, त्यात ‘रोल-डाउन’ स्ट्रॅटेजीचा वापर केल्यामुळे गुंतवणूक मुदतीपर्यंत ठेवली जाते, ज्यामुळे गुंतवणूकदारांना परताव्याबद्दल स्पष्टता मिळते. फंडाचा दुसरा भाग आर्बिट्राज फंडांमध्ये गुंतवला जातो, जो कमीत कमी अतिरिक्त जोखमीसह परतावा वाढवण्याचे काम करतो.

या फंडात गुंतवणूक करण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे हा कर बचत करण्यात सक्षम आहे. पारंपरिक गुंतवणुकींपेक्षा वेगळा आहे. पारंपारिक डेट म्युच्युअल फंड किंवा फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) मध्ये, तुम्हाला मिळणाऱ्या नफ्यावर तुमच्या सध्याच्या इन्कम टॅक्स स्लॅबनुसार कर लागतो. एक्सिस इन्कम प्लस आर्बिट्राज पॅसिव्ह एफओएफ हा फंड वेगळ्या प्रकारे काम करतो. जर तुम्ही या फंडामध्ये २४ महिन्यांपेक्षा जास्त काळ गुंतवणूक ठेवल्यास, तुमच्या नफ्यावर लॉन्ग-टर्म कॅपिटल गेन (LTCG) टॅक्स लागू होतो, ज्याचा दर फक्त १२.५% आहे.

ऍक्सिस एएमसीचे सीआयओ श्री. आशिष गुप्ता म्हणाले, “सध्याची बाजारपेठ अशा स्थितीत आहे जिथे गुंतवणूकदार स्थिर उत्पन्न साधनांमधून चांगले परतावे मिळवू शकतात आणि गुंतवणूकदार पारंपारिक स्थिर उत्पन्न साधनांसारखे (जसे की फिक्स्ड डिपॉझिट्स) स्थिर परतावा देणाऱ्या परंतु त्याच वेळी त्यांच्यावर लागणारा कर देखील कमी असावा. ऍक्सिस इन्कम प्लस आर्बिट्रेज पॅसिव्ह एफओएफ हा गुंतवणूकदारांच्या या गरजा पूर्ण करण्यासाठी योग्य वेळी आलेला एक उपाय आहे. हा फंड निष्क्रिय रोल डाउन धोरणे आणि पूर्णपणे हेज्ड आर्बिट्रेज एक्सपोजर वापरून सुरक्षित, स्थिर आणि पारदर्शक गुंतवणूक पर्याय प्रदान करतो.”

याव्यतिरिक्त, हा फंड गुंतवणूकदारांच्या प्रमुख चिंता दूर करतो – ज्यांना “5Ps” म्हणून संबोधले जाते: बाजारात भरपूर पर्याय उपलब्ध असल्यामुळे योग्य फंड निवडण्यात अडचण, फंड रिटर्नचा अंदाज लावण्याची क्षमता, पोर्टफोलिओ पारदर्शकता, फंड कुठे आणि कसे गुंतवले जातात याबद्दल स्पष्ट माहिती, कर-पश्चात परतावे आणि क्रेडिट धोक्यापासून संरक्षण. उच्च-गुणवत्तेच्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करून, हा फंड क्रेडिट जोखीम कमी करण्याचा प्रयत्न करतो. त्याची पॅसिव्ह रचना फंड रिटर्नची पारदर्शकता आणि अंदाज प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवते, तर हायब्रिड मॉडेल, कर्ज आणि आर्बिट्रेज फंड एकत्रित करून, पोर्टफोलिओला बाजारातील चढउतारांना अधिक लवचिक बनवते. ते विविधीकरणाद्वारे (वेगवेगळ्या मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवणूक करून) जोखीम देखील कमी करते.

Source: RBI, Axis MF Research as on 10th Oct 2025

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading