इंडिया रेटिंग्सने स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे रेटिंग ‘IND AA+’ वर स्थिर दृष्टिकोनासह कायम ठेवले
चेन्नई : भारतातील अग्रगण्य स्वतंत्र आरोग्य विमा पुरवठादार कंपनी स्टार हेल्थ अॅण्ड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (स्टार हेल्थ) ने इंडिया रेटिंग्स अॅण्ड रिसर्च (Ind-Ra) यांनी कंपनीचे रेटिंग ‘IND AA+’ स्थिर दृष्टिकोनासह कायम ठेवले असल्याचे जाहीर केले आहे. तसेच सबऑर्डिनेटेड डेब्ट रेटिंग ‘IND AA’ ला स्थिर दृष्टिकोनासह पुन्हा पुष्टी दिली आहे.
ही पुष्टी स्टार हेल्थची बाजारपेठेतील मजबूत आघाडी, ठोस अंडररायटिंग पद्धती आणि वेगळ्या ऑपरेटिंग मॉडेलचे प्रतिबिंब आहे. कंपनीकडे रिटेल हेल्थ इन्शुरन्स बाजारपेठेत 33% हिस्सा असून, हा भारतातील सर्वाधिक आहे. आर्थिक वर्ष 25 साठी कंपनीने 16,781 कोटी रु.चा ग्रॉस रिटन प्रीमियम (GWP) नोंदविला. विस्तृत वितरण नेटवर्क आणि मजबूत ब्रँड इक्विटीमुळे हे साध्य झाले.
Ind-Ra ने नमूद केले आहे की स्टार हेल्थची आर्थिक स्थिरता मार्च 2025 पर्यंत केवळ स्केल आणि सॉल्व्हन्सी ही 2.21x सॉल्व्हन्सी रेशो मुळे नाही. हा नियामक किमान 1.5x पेक्षा खूप जास्त आहे. तर ऑपरेशनल मॉडेलमुळे देखील बळकट झाली आहे. यात मोठ्या प्रमाणावर इन-हाऊस डॉक्टरांचा समावेश, कार्यक्षम क्लेम प्रक्रिया प्रणाली आणि जबाबदार जोखीम निवड यांचा समावेश आहे. या क्षमतांमुळे कंपनीला सक्षम नफा टिकवून ठेवता आला असून आर्थिक वर्ष 25 मध्ये निव्वळ नफा 646 कोटी रु. वर पोहोचला आहे. यामुळे ग्राहकांचा विश्वास अधिक बळकट झाला असून दीर्घकालीन विकासही साधला आहे.
क्लेम प्रोसेसिंग हे स्टार हेल्थसाठी एक महत्त्वपूर्ण वेगळेपणा देणारे राहिले आहे. कंपनीने कार्यक्षम, तंत्रज्ञान-सक्षम क्लेम सेटलमेंट चौकट तयार केली असून इन-हाऊस डॉक्टरांच्या वैद्यकीय तज्ज्ञ कौशल्याचे तिला पाठबळ आहे. यामुळे पॉलिसीधारकांसाठी वेगवान, पारदर्शक आणि न्याय्य सेटलमेंट सुनिश्चित होते. त्यायोगे आरोग्यसेवा संरक्षणात कंपनीची एक विश्वासू पार्टनर म्हणून ओळख अधिक मजबूत झाली आहे.
या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना स्टार हेल्थ अॅण्ड अलाइड इन्शुरन्सचे चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर अनीश श्रीवास्तव म्हणाले, “Ind-Ra कडून मिळालेल्या या रेटिंग पुष्टीकरणामुळे आरोग्य विमा क्षेत्रातील आमचे नेतृत्व अधोरेखित झाले आहे. हे आमच्या अंडररायटिंग पद्धतींची ताकद, आमच्या इन-हाऊस डॉक्टरांचे कौशल्य आणि क्लेम्स जलद व पारदर्शक पद्धतीने प्रोसेस करण्याची आमची सिद्ध क्षमता यांचे प्रतिबिंब आहे. या वैशिष्ट्यांसह आमचे बाजारपेठेतील अग्रणी स्थान आमच्या ठामपणे टिकून राहण्याचा आधार आहे. नियामक वातावरण सातत्याने बदलत असताना, स्टार हेल्थ इन्शुरन्स सतत बदलण्यास व प्रगती करण्यास सक्षम आहे. ग्राहक-केंद्रितता, नाविन्यपूर्णता आणि पारदर्शकतेबाबतची आमची दीर्घकालीन बांधिलकी आम्हाला आमच्या स्टेकहोल्डर्सना उत्कृष्टतेने आणि विश्वासाने सेवा देण्यास सक्षम करेल.”
Ind-Ra कडून पुन्हा करण्यात आलेल्या या पुष्टीकरणामुळे भारतातील हेल्थकेअर इकोसिस्टममध्ये स्टार हेल्थच्या विश्वासार्ह भागीदार म्हणून असलेल्या भूमिकेवर शिक्कामोर्तब झाले आहे. कंपनी IRDAI च्या ‘2047 पर्यंत सर्वांसाठी विमा’ या दृष्टिकोनाशी जुळवून घेण्यास, गुणवत्तापूर्ण हेल्थकेअर प्रोटेक्शनचा विस्तार करण्यास आणि सेवा वितरण व आर्थिक स्थैर्यात उद्योग-आघाडी मापदंड प्रस्थापित करण्यास कटिबद्ध आहे.
अधिक माहितीसाठी कृपया इंडिया रेटिंग्सचे संपूर्ण प्रेस रिलीज वाचा:
https://www.indiaratings.co.in/pressrelease/79400
