Monday, June 15, 2026
Latest NewsLIFESTYLE

नवरात्री निमित्त चित्रकार तानाजी अवघडे यांच्या ‘उर्जा’ या चित्रप्रदर्शनाचे २८ सप्टेंबरपर्यंत आयोजन

पुणे  : येत्या नवरात्री निमित्त आध्यात्मिक व प्रतीकात्मक चिन्हांच्या शक्तीची अनुभूती पुणेकर रसिकांना अनुभविता येणार आहे. निमित्त आहे प्रसिद्ध चित्रकार तानाजी अवघडे यांच्या ‘उर्जा- एक आध्यात्मिक अनुभूती’ या चित्रप्रदर्शनाचे.

घोले रस्त्यावरील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी येथे येत्या मंगळवार दि. २३ सप्टेंबर ते रविवार दि. २८ सप्टेंबर दरम्यान सदर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. २३ सप्टेंबर रोजी सायं. ५ वाजता कुमार कॉर्पचे व्यवस्थापकीय संचालक हितेश जैन, पुण्याच्या प्राप्तीकर विभागाचे आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन संपन्न होईल.

प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन संपन्न झाल्यानंतर २८ सप्टेंबर पर्यंत दररोज सकाळी ११ ते सायं ७ पर्यंत सदर प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असेल. कुमार कॉर्प, आर्ट टू डे गॅलरी आणि आर्ट टू डे फाऊंडेशन यांचे विशेष सहकार्य प्रदर्शनासाठी लाभले आहे.

पूर्वापार चालत आलेल्या सांस्कृतिक परंपरेतून शाश्वत चिन्हे व प्रतिके यामधून प्रगट होणारी आध्यात्मिकता या चित्रप्रदर्शनाच्या निमित्ताने पुणेकर रसिकांना अनुभविता येणार असून तेजोमय जाणीवेची प्रतिके, जीवनाविषयक तत्वज्ञानाची परिकल्पना भौमितिक रुपात मांडण्याचा प्रयत्न या प्रदर्शनात करण्यात आला आहे. आध्यात्मिक दृष्ट्या एका वेगळ्याच जगाचे दर्शन या निमित्ताने रसिकांना होईल, असा विश्वास यावेळी चित्रकार तानाजी अवघडे यांनी व्यक्त केला. प्रदर्शना दरम्यान अॅक्रॅलिक, जलतरंग, तैलचित्रे पाहता येतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading