Wednesday, June 3, 2026
BusinessLatest NewsPUNE

गोखले कंस्ट्रक्शन्सतर्फे नवरात्रातील भव्य गृहमहोत्सवाचे आयोजन

घरखरेदीदारांसाठी ‘९९९९’ ची योजना ठरणार विशेष आकर्षण

पुणे  : पुणे शहरातील मोक्याच्या ठिकाणी दर्जेदार निवासी व व्यापारी संकुलांची निर्मिती करण्यात नावलौकिक असलेल्या गोखले कंस्ट्रक्शन्सने यंदाच्या नवरात्रातील आपल्या भव्य प्रॉपर्टी फेस्टिव्हलची  घोषणा केली आहे. सदर महोत्सवाचे हे सलग १३ वे वर्ष असून, शहरातील प्रमुख ठिकाणी साकारणाऱ्या विविध गृहप्रकल्पांचे पर्याय व आर्थिक दृष्ट्या अत्यंत लाभदायक अशा योजना यामुळे सदर फेस्टिवल नेहमीच घर किंवा ऑफिस घेवू इच्छिणाऱ्या ग्राहकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो.

याविषयी माहिती देताना गोखले कंस्ट्रक्शन्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विशाल गोखले म्हणाले, “शहराच्या विविध भागांमध्ये साकारत असलेल्या काही निवडक गृहप्रकल्पांमध्ये सदनिका घेतल्यास रुपये ९९९९ प्रती चौरस फुट असा अत्यंत विशेष दर यंदाच्या नवरात्र गृहमहोत्सवाचे महत्वाचे आकर्षण असेल.”

त्याचप्रमाणे यावर्षी पुण्यातील प्रभात रस्त्यावर साकारत असललेल्या भव्य गृहसंकुलांसाठी देखील वेगळी अशी विशेष सवलत योजना असेल असे सांगत गोखले म्हणाले, “गेली १२ वर्षे ग्राहकांनी आमच्या नवरात्र प्रॉपर्टी फेस्टिव्हलला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावर्षी २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या नवरात्राच्या काळात घरखरेदीदारांना प्रभात रस्ता, शिवाजी नगर, सहकार नगर, कोथरूड, मॉडेल कॉलनी व कर्वे नगर येथे नजीकच्या भविष्यात साकारणाऱ्या भव्य व अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त असणाऱ्या निवासी प्रकल्पांच्या माध्यमातून ३ बीएचकेच्या सदनिकांपासून ७. ५ बीएचकेच्या स्काय व्हिला पर्यंतचे पर्याय उपलब्ध असतील.”

नवरात्र प्रॉपर्टी फेस्टिव्हलमध्ये घर किंवा ऑफिस घेताना गोखले कंस्ट्रक्शन्सतर्फे ग्राहकांना विविध आकर्षक सवलती उपलब्ध करून देण्यात येण्याची परंपरा यावर्षी देखील कायम असेल. सदर फेस्टिवल हा कोथरूड येथील ‘गोखले बिझनेस बे’ या आलिशान व्यापारी संकुलात आजोजित करण्यात येणार असल्याचे गोखले यांनी नमूद केले. महोत्सवाचा भाग असलेले प्रकल्प रेरा नोंदणीकृत आहेत. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading