गणेशोत्सवानिमित्त 105 वर्षीय जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक राजेंद्र डी. कलघटगी यांचा सन्मान
बेळगाव : आजच्या पिढीला स्वातंत्र्य चळवळीची माहिती नाही. त्यामुळे स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याची माहिती व्हावी ,त्याचे कार्य नव्या पिढीला कळावे या हेतूने गणेश उस्त्वाचे निमित्त साधत जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक राजेंद्र कलघटगी यांच्या विशेष सन्मान बेळगावचे सुपुत्र आणि दुबई प्रशासनातील उच्च अधिकारी सोमनाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला .
बेळगावला स्वातंत्र्य सैनिकांची मोठी परंपरा आहे. 105 वर्षांचे राजेंद्र कलघटगी हे त्यातलेच एक आदरणीय व्यक्तिमत्व. त्यांचा ह्रदयस्पर्शी सत्कार सदाशिवनगर येथील बेळगावचे सुपुत्र आणि गेली 37 वर्षे दुबईमध्ये उत्कृष्ट सेवा देत असलेले सोमनाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
निवडक नागरिकांच्या उपस्थीतीत स्वातंत्र्य चळवळीतील इतिहासावर यावेळी मनोगते व्यक्त करण्यात आली .सोमनाथ पाटील यांनी स्वागत करीत आपले मनोगत मांडले.
सौ. शालन सोमनाथ पाटील यांच्यासह अनेक महिलांनी कलघटगींचे औक्षण केले .
कलघटगी यांना यावेळी शाल, सन्मानचिन्ह,फळकरंडी, भेटवस्तू, पानविडा देउन यथोचित सत्कार करण्यात आला .अन्य उपस्थित मान्यवरांनी व मित्र परीवारानी शुभेच्छा व्यक्त केल्या .
यावेळी प्रकाश बेळगुंदकर, किशोर काकडे, डॉक्टर जाली दांपत्य, हंगेरगीकर यानी राजेंद्र कलघटगींचे अभिनंदन करीत त्याना दिर्घायुष्य व सुआरोग्यासाठी प्रार्थना केली. सत्काराला उत्तर देताना कलघटगीजीनी सर्वाचे आभार मानले.
