Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मराठा आरक्षण आंदोलकांना मुंबई सोडण्याचे हायकोर्टाचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी 

न्यायालय आणि राज्य सरकारच्या नियमांचा भंग केल्यामुळे मराठा आंदोलकांनी दुपारी तीन वाजेपर्यंत आझाद मैदान मोकळे करावे, अशा नोटीस मुंबई पोलिसांनी मराठा आरक्षण आंदोलकांवर बजावले आहे. मात्र आंदोलकांनी या नोटीस घेण्यास नकार दिला आहे. 

विधिज्ञ गुणवंत सदावर्ते यांनी मराठा आरक्षण आंदोलनामुळे मुंबई ठप्प झाल्याचा आरोप करून याप्रकरणी उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा अशी मागणी करणारी जनहित याचिका न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने आझाद मैदान खाली करून घ्यावे, असे आदेश प्रशासनाला दिले आहेत. 

या आदेशानुसार मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील आणि आंदोलनाच्या समन्वयकांना नोटिसा बजावल्या. मात्र, त्यांनी या नोटिसा स्वीकारण्यात नकार दिला आहे. पोलिसांनी गोळ्या घातल्या तरीही माघार घेणार नाही, अशी आंदोलकांची भूमिका आहे 

सरकारने पाच हजार आंदोलकांची सोय करण्याची हमी दिली. मात्र पाचशे आंदोलकांची ही सोय केली नाही, असा आंदोलकांचा आरोप आहे. सरकारने माध्यमांचा वापर करून आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही कायद्याचे काटेकोर पालन करत आहोत, असा त्यांचा दावा आहे. 

मात्र, माणिक नागरिकांमध्ये भयाचे वातावरण आहे. त्यांना निर्भयपणे वावरू द्या. न्यायालयाच्या आदेशाचा आव्हान करू नका तसे झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू परिस्थितीची पाहणी करू, असा इशारा उच्च न्यायालयाने आंदोलक आणि राज्य सरकारला दिला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading