‘पीडीएफए लीग’ फुटबॉल स्पर्धा : न्यु इंडिया सॉकर संघाचे सलग तीन विजय !!
बावधन येथील हॉटफुट फुटबॉल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या प्रथम श्रेणी गटामध्ये सुपरसिक्स् फेरीच्या पहिल्या सामन्यात न्यु इंडिया सॉकर संघाने असोसिएशन पुना सोशल संघाचा ५-२ असा सहज पराभव केला. न्यु इंडिया सॉकर संघाच्या झेपनाह मेनेझेस याने दोन गोल नोंदविले. रोहन मुळे आणि विवान भोसले यांनी पेनल्टीवर मिळालेल्या संधीचा फायदा घेत गोल केला. विशाल नलागे याने एक गोल करून संघाची आघाडी फुगवली. असोसिएशन पुना सोशल संघाकडून समेल हंसदा आणि शाबिर शेख यांनी एकेक गोल केले. दुसऱ्या सामन्यात विशाल नलांगे आणि झेपनाह मेनेझेस यांनी केलेल्या गोलपूर्ण कामगिरीच्या जोरावर न्यु इंडिया सॉकर संघाने जाएंट्स एफसीचा २-१ असा पराभव केला. जाएंट्स एफसीकडून आशितोष कांबळे याने एक गोल केला.
आपल्या विजयी कामगिरीचा रथ कायम ठेवतना न्यु इंडिया सॉकर संघाने संगम यंग बॉईज ब संघाचा ४-१ असा पराभव केला. न्यु इंडिया सॉकर संघाकडून विशाल नलांगे याने दोन गोल केले. झेपनाह मेनेझेस आणि कार्तिक भंडारे यांनी प्रत्येकी एकेक गोल केला. संगम यंग बॉईज ब संघाकडून तेजस घाडगे याने जादाच्या वेळेत एक गोल केला. असोसिएशन पुना सोशल आणि रेंजहिल्स् यंग बॉईज यांच्यातील सामना १-१ असा बरोबरीत सुटला. असोसिएशन पुना सोशल संघाकडून गबीनसिन पॉल याने तर, रेंजहिल्स् यंग बॉईज संघाकडून प्रथमेश मोरे याने गोल नोंदविला.
सामन्यांचा सविस्तर निकालः प्रथम श्रेणी गटः सुपर-सिक्स गटसाखळी फेरीः
१) न्यु इंडिया सॉकरः ५ (रोहन मुळे ५ मि. (पेनल्टी), झेपनाह मेनेझेस १८, ७३ मि., विशाल नलागे ३१ मि., विवान भोसले ६९ मि. (पेनल्टी) वि.वि. असोसिएशन पुना सोशलः २ (समेल हंसदा २५ मि., शाबिर शेख ३४ मि.);
२) न्यु इंडिया सॉकरः २ (विशाल नलांगे ४० मि., झेपनाह मेनेझेस ४२ मि.) वि.वि. जाएंट्स एफसीः १ (आशितोष कांबळे २६ मि.);
३) न्यु इंडिया सॉकरः ४ (विशाल नलांगे ८, ७० मि., झेपनाह मेनेझेस १२ मि., कार्तिक भंडारे ३६ मि. ) वि.वि. संगम यंग बॉईज बः १ (तेजस घाडगे ९०+२ मि.);
४) असोसिएशन पुना सोशलः १ (गबीनसिन पॉल १९ मि.) बरोबरी वि. रेंजहिल्स् यंग बॉईजः १ (प्रथमेश मोरे ६८ मि.);
