Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENTLatest News

सोनाली खरे पहिल्यांदाच साकारणार खलनायिका

स्टार प्रवाहवर नवनव्या मालिकांचा प्रवाह अखंड सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच सुरु झालेली हळद रुसली कुंकू हसलं मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतानाच आता नशिबवान आणि लपंडाव या नव्याकोऱ्या मालिकांच्या प्रोमोने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं आहे. नशिबवान मालिकेतून सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली खरे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जवळपास १० वर्षांनंतर त्या पुन्हा मालिका विश्वात दमदार एण्ट्री घेण्यासाठी सज्ज आहेत. याआधी स्टार प्रवाहच्या बे दुणे दहा मालिकेत त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारली होती. नशिबवान मालिकेच्या निमित्ताने त्या पहिल्यांदा खलनायिका साकारणार आहेत. उर्वशी असं त्यांच्या पात्राचं नाव आहे. दिसायला अतिशय सुंदर मात्र रुपाचा प्रचंड असलेली उर्वशी खूप स्वार्थी आहे. ती आपल्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. भावनांना उर्वशीच्या आयुष्यात जागा नाही.

उर्वशी या पात्राबद्दल सांगताना सोनाली खरे म्हणाल्या, स्टार प्रवाह परिवाराचा मी भाग होतेच पुन्हा एकदा या परिवारात सामील होताना अतिशय आनंद होतोय. माझ्या करिअरची सुरुवातच मालिकेने झाली होती. त्यामुळे टीव्ही हे आवडतं माध्यम आहे. नशिबवान मालिकेत उर्वशी हे पात्र साकारणार आहे. पहिल्यांदाच खलनायिकेच्या रुपात दिसणार आहे. खूप उत्सुकता आहे. चित्रपट, वेबसीरिज, माझी निर्मिती संस्था यात प्रचंड व्यस्त होते. मात्र तरीही मालिकेत काम करण्याची इच्छा होती. या पात्राविषयी जेव्हा विचारणा झाली तेव्हा मला मालिकेचा विषय आणि व्यक्तिरेखा खूपच भावली. स्टार प्रवाह वाहिनी आणि कोठारे व्हिजन्ससारखी नावाजलेली निर्मिती संस्था असा छान योग जुळून आलाय. उर्वशी अतिआत्मविश्वासू आणि स्वार्थी आहे. हे पात्र माझ्या स्वभावाच्या अगदी विरुध्द आहे त्यामुळे कस लागतोय. गणेशोत्सवाच्या धामधूमीत मालिकेचा श्रीगणेशा होणार आहे त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी खूप खास आहे. प्रेक्षकांना ही भूमिका आणि नशिबवान मालिका आवडेल याची खात्री आहे. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका नशिबवान १५ सप्टेंबरपासून रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading