स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘विद्यार्थी महोत्सव २०२५” चे आयोजन
पुणे: सुवार्ता फाउंडेशनच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त 15 ऑगस्ट 2025 रोजी पुणे शहर पातळीवर विविध सांस्कृतिक आणि देशभक्तीपर कार्यक्रमांचा समावेश असलेल्या विद्यार्थी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लुकस केदारी यांनी दिली.
या विद्यार्थी महोत्सवाचे यंदाचे तिसरे वर्ष असून यामध्ये पुणे शहर पातळीवरून एक हजार पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी होणार आहेत, तसेच पुणे शहरातील सुमारे 100 पेक्षा जास्त शाळा, महाविद्यालये या स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत. तसेच पुणे शहरातील साहित्य, कला, क्रीडा, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर देखील या विद्यार्थी महोत्सवाला उपस्थित राहणार होणार आहेत. पर्यावरण, देशाची एकात्मता, विज्ञान,संविधानिक मूल तत्वे अशी थीमवर सदरच्या सांस्कृतिक स्पर्धा ह्या अण्णाभाऊ साठे सभागृह, येरवडा, पुणे या ठिकाणी सकाळी 11 ते संध्य. 7 वाजेपर्यंत संपन्न होणार आहेत, अधिक माहितीसाठी 7709599848 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते लुकस केदारी यांनी केले आहे.
