पी अँड जी शिक्षा आणि प्रथम फाउंडेशन यांनी महाराष्ट्रात विशेष उन्हाळी शिबिर यशस्वीपणे पूर्ण केले
पुणे: आपल्या प्रमुख सीएसआर उपक्रम ‘पी अँड जी शिक्षाच्या’ 20 वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा एक भाग म्हणून, टायड, विक्स, जिलेट यांसारख्या ब्रँड्सचा निर्माता असलेल्या पी अँड जी इंडियाने प्रथम एज्युकेशन फाउंडेशनसोबत भागीदारी करून रायगड, पुणे व सातारा जिल्ह्यातील वंचित मुलांसाठी सीएएमएएल(कॉम्बाइंड अॅक्टिव्हिटीज फॉर मॅक्सिमाइझ्ड लर्निंग) का कॅम्प’ हे व्यापक आणि राष्ट्रीय स्तरावरील उन्हाळी शिक्षण शिबिर आयोजित केले. हे शिबिर मुलांनी उन्हाळी सुट्टीचा योग्य उपयोग करून समजून व सरळपणे वाचन करणे शिकावे, आपले विचार तोंडी आणि लेखी स्वरूपात मांडता यावेत, तसेच मजबूत विश्लेषणात्मक व गणिती कौशल्ये आत्मसात करावीत यासाठी आयोजित करण्यात आले होते.
रायगड, पुणे आणि सातारा सहित संपूर्ण महाराष्ट्रात या कार्यक्रमासाठी सुमारे 54000 युवक स्वयंसेवकांना एकत्रितपणे सहभागी करून घेतले गेले, ज्यांनी मिळून वंचित समुदायांतील 6.5 लाखांहून अधिक मुलांना शिकवले आणि उन्हाळ्याला एक वेगवान शिक्षणाचा हंगाम बनवले. हे शिबिर राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था आणि महाविद्यालयांच्या मोठ्या सहकार्याने आयोजित करण्यात आले.
या शिबिरामागील प्रेरणा अशी की, उन्हाळी सुट्ट्यांमध्ये विशेषतः इयत्ता 5वी ते 6वी मध्ये जाणाऱ्या वंचित मुलांमध्ये – शिक्षणातील सध्याची पातळी आणि अपेक्षित पातळी यामधील दरी वाढते, जेव्हा त्यांच्या जवळ आवश्यक शिक्षणसाधनांची कमतरता असते. त्यामुळे ‘लवकर सुरूवात – मजबूत पाया’ या दृष्टिकोनातून शिबिराचे आयोजन करण्यात आले, जे मूलभूत शैक्षणिक कौशल्ये मजबूत करून मुलांना पुढील वर्गासाठी तयार करते. यामुळे शिक्षणातील दरी कमी होण्यास मदत होते, मुख्य शैक्षणिक कौशल्ये मजबूत होतात आणि मुले त्यांच्या नवीन शैक्षणिक वातावरणाशी आत्मविश्वासाने जुळवून घेण्यासाठी सज्ज होतात.
हे शिबिर पूर्णतः स्थानिक स्वयंसेवकांच्या नेतृत्वाखाली राबवले गेले, ज्यामध्ये हायस्कूलमधील विद्यार्थी, माता, कॉलेज विद्यार्थी, शिक्षक आणि इतर सामील होते. हे स्वयंसेवक आपल्या गावांमध्ये, मोहल्ल्यांमध्ये आणि शेजारील भागांमध्ये शिक्षण सत्र घेतात आणि मुलांना खेळावर आधारित शिक्षण क्रियाकलापांमध्ये गुंतवून त्यांची मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्ये विकसित करण्याचे काम करतात. परिचयाचा हा शिक्षण मॉडेल आणि आपल्या समाजातील ज्येष्ठांकडून शिकण्याच्या सोयीमुळे निर्माण होणाऱ्या आत्मीयतेमुळे या उपक्रमाचा देशभरातील 50 लाखांहून अधिक मुलांवर सकारात्मक परिणाम झाला, ज्यामध्ये 4.5 लाखांहून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले आणि त्यामुळे हा उपक्रम देशातील सर्वात मोठ्या समुदाय-आधारित उन्हाळी शिक्षण उपक्रमांपैकी एक ठरला. तसेच, या शिबिरासाठी विविध राज्य सरकारांच्या संस्थांशी भक्कम भागीदारी करण्यात आली, जिथे अधिकाऱ्यांनी या उन्हाळी शिबिराची गरज आणि त्याचा संभाव्य प्रभाव ओळखून मुलांसाठी उन्हाळा अधिक अर्थपूर्ण बनवण्यासाठी आवश्यक संसाधने एकत्र आणली.
रायगड जिल्ह्यातील खोपोली (खालापूर) गावात, टाईड या पी अँड जीच्या प्रमुख डिटर्जंट ब्रँडने शेकडो वंचित मुलांसाठी विशेष स्वच्छता जागरुकता कार्यशाळा आयोजित केली. या कार्यशाळेद्वारे टाईड आणि पी अँड जी शिक्षाने मुलांना स्वच्छ राहण्याच्या उत्तम सवयी शिकवल्या, जेणेकरून दररोजचा दिवस ताज्या व स्वच्छ सुरुवातीने सुरू होईल. टाईड आणि पी अँड जी शिक्षाने घरोघरी जाऊन मुलांचे शालेय गणवेष गोळा केले आणि ते स्वच्छ धुऊन परत दिले, जेणेकरून मुले नवीन शैक्षणिक वर्ष उत्साहाने सुरू करू शकतील. कार्यशाळेदरम्यान मुलांनी आपल्या पालकांसाठी खास हाताने बनवलेली कार्डे तयार केली, ज्यामधून त्यांनी आपल्या प्रेमाची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आणि कार्यशाळेत शिकलेल्या स्वच्छतेच्या सवयींना आत्मसात करून त्यांचे काळजीपूर्वक पालन करण्याचे वचन दिले.
या उपक्रमाबाबत प्रतिक्रिया देताना ईनाक्षी देवा, प्रमुख – सीएसआर व कम्युनिकेशन्स, प्रॉक्टर अँड गॅम्बल इंडिया म्हणाल्या, “पी अँड जी शिक्षा मध्ये आम्ही असे मानतो की शिक्षण कधीच थांबू नये – विशेषतः वंचित समुदायांतील मुलांसाठी. सीएएमएएल का कॅम्प 2025 साठी आम्ही प्रथम एज्युकेशन फाउंडेशनसोबत भागीदारी केल्याचा आम्हाला अत्यंत अभिमान आहे! मैदानात असलेल्या आमच्या स्वयंसेवकांसोबत मिळून, आम्ही सहभागी मुलांसाठी उन्हाळी सुट्टीची पुनःकल्पना करत आहोत, एका अशा काळातून जेव्हा मुलांचे शिक्षण मागे पडते, त्याऐवजी हा काळ वाचन व गणितातील मूलभूत कौशल्ये निर्माण करण्याची संधी ठरावा, हे आम्ही खेळाच्या माध्यमातून शक्य करत आहोत, जेणेकरून शिक्षणामध्ये सुट्टीचा आनंदही टिकून राहील. या उपक्रमाला खऱ्या अर्थाने विशेष बनवते ते म्हणजे याचे विशाल प्रमाण आणि सहकार्याची भावना – हा उपक्रम संपूर्णपणे समुदायाचा, समुदायासाठी चालवला जातो आणि राज्य सरकारांचा ठळक पाठिंबा त्यामध्ये आहे. सुमारे 54000 युवक स्वयंसेवकांना योग्य प्रशिक्षण आणि साधने दिल्यामुळे, आम्ही महाराष्ट्रभर 6.5 लाखांहून अधिक मुलांपर्यंत पोहोचलो आणि शिक्षण, सशक्तीकरण आणि आशेची एक सकारात्मक लाट निर्माण केली. या गोष्टीचे उदाहरण आहे की, जेव्हा उद्दिष्ट आणि भागीदारी एकत्र येतात, तेव्हा किती मोठा बदल शक्य होतो.”
प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या सीईओ, डॉ. रुक्मिणी बॅनर्जी म्हणाल्या, “2025 हे आमच्यासाठी एक विशेष वर्ष आहे कारण प्रथम आमच्या 30व्या वर्धापन दिनाचा उत्सव साजरा करत आहे. आमच्या दीर्घकालीन भागीदार पी अँड जी शिक्षा साठीही हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, कारण त्यांना यावर्षी 20 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे आम्ही काहीतरी मोठे आणि परिणामकारक करण्याचा निर्णय घेतला आणि तिथूनच ‘सीएएमएएल का कॅम्प 2025’ या उपक्रमाची संकल्पना तयार झाली – हा एक उन्हाळी उपक्रम जो प्राथमिक शाळेतील इयत्ता 5 वी ते 6 वीमध्ये जाणाऱ्या मुलांचे मूलभूत कौशल्ये बळकट करण्यासाठी राबवण्यात आला. खूप मुलांनी कोविड-19 महामारीच्या काळात शालेय शिक्षणाची सुरुवातच गमावली, त्यामुळे त्यांना वाचन, लेखन आणि गणितातील मूलभूत कौशल्यांमध्ये ‘कॅच अप’ करण्यासाठी मदतीची गरज आहे, जेणेकरून ते 6 वी मध्ये आत्मविश्वासाने आणि सक्षमपणे प्रवेश करू शकतील.
या उपक्रमाला व्यापक स्तरावर नेण्यासाठी, समुदाय, शाळा, महाविद्यालये आणि सरकारांशी असलेली आमची भागीदारी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण हेच घटक युवक स्वयंसेवकांना प्रेरणा देतात आणि त्यांना संघटित करतात, जे आपल्या परिसरात उन्हाळी सुट्टीत मुलांसोबत काम करू शकतात. हीच काम करण्याची एकमात्र प्रभावी पद्धत आहे जी संपूर्ण देशभरातील लाखो मुलांपर्यंत उन्हाळी सुट्टीच्या काळात पोहोचू शकते. आम्ही पी अँड जीसह या रोमांचक प्रवासाचा भाग असल्याबद्दल अत्यंत आभारी आहोत.”
