टीव्हीएस ज्युपिटर १२५ आता ड्युअल टोन अवतारात, स्टाईल आणि स्मार्ट फिचरसह !
बंगळुरु : जगातील प्रमुख दुचाकी आणि तीन-चाकी वाहननिर्मिती कंपन्यांमध्ये गणल्या जाणा-या टीव्हीएस मोटर कंपनीने आज टीव्हीएस ज्युपिटर लाइन-अपमधील सर्वात नवीन रेंजची घोषणा केली. टीव्हीएस ज्युपिटर १२५ ड्युअल टोन स्मार्ट एक्सकनेक्ट (एसएक्ससी)चे आज अनावरण करण्यात आले. अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण अशी ही नवी दुचाकी आकर्षक स्टाईल आणि जास्त व्हॅल्यू प्रदान करते. प्रत्येक १२५ सीसी स्कूटरपेक्षा जास्त या ब्रॅण्डच्या वचनाला ही स्कूटरची वैशिष्ट्ये तंतोतंत जुळतात.
टीव्हीएस ज्युपिटर १२५ ड्युअल टोन एसएक्ससी स्कूटर तिच्या आधुनिक निओ मस्क्युलिन डिझाइन आणि पहिल्या सेगमेंटमधील वैशिष्ट्यांमुळे आजकाल बाईकस्वारांना अपेक्षित असलेल्या सर्व अपेक्षा पूर्ण करते. ज्या बाईकस्वारांना आपल्या रोजच्या प्रवासाताली दुचाकीत आपले विचार आणि आकांक्षा दिसाव्यात अशी अपेक्षा आहे, त्यांच्यासाठी ही दुचाकी उत्तम निवड आहे. ही दुचाकी आयव्हरी ब्राऊन आणि आयव्हरी ग्रे अशा दोन आकर्षक ड्युअल टोन रंगात उपलब्ध आहे. हे दोन्ही रंग शहरी भागांत राहणा-या आधुनिक आणि प्रीमियम निवडीला पसंती देणा-या ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करतात.
टीव्हीएस मोटर कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष, कम्प्युटर आणि ईव्ही बिझनेस प्रमुख तसेच कॉर्पोरेट ब्रँण्ड आणि मीडिया प्रमुख श्री. अनिरुद्ध हळदर म्हणाले, ‘‘ आजचे ग्राहक फक्त स्कुटर खरेदी करताना त्यांच्या प्रगतीशील विचारांच्या प्रतिमेचा विचार करुन खरेदीची गुंतवणूक करतात. टीव्हीएस ज्युपिटर ११० च्या यशस्वी अनावरणानंतर टीव्हीएस ज्युपिटर १२५ ला नवीन आकार देणे गरजेचे होते. टीव्हीएर १२५ ड्युअल टोन एसएक्ससी दुचाकीतील अत्याधुनिक बदल दर्शवते. ही दुचाकी बाईकस्वारांच्या उत्तम कामगिरीच्या अपेक्षा पूर्ण करेल. दुचाकीवर आरामदायी प्रवास अनुभवताना अत्याधुनिक कनेक्विव्हिटीचाही अनुभव घेता येईल. उच्च तत्वज्ञानाला बळकटी देण्यासाटी आम्ही या दुचाकीचे अनावरण करत आहेत. या दुचाकीत आमच्या बाईकस्वारांना गरजेच्या असलेल्या प्रत्येक गोष्टी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.’’
वैशिष्ट्ये –
- आधुनिक डिझाइन : दोन रंगाच्या रचनेत दुचाकी उपलब्ध आहे. आकर्षक डिझायनिंगमधील आसनव्यवस्था, एलईडी दिवा, आकर्षक आणि तेवढेच मजबूत अलॉय चाके.
- उत्तम पिकअप आणि मायलेज: यात १२४.८ सीसीचे सिंगल-सिलिंडर इंजिन आहे. या इंजिनची कार्यक्षमता चांगली आहे. हे इंजिन दुचाकीला ४ हजार ५०० आरपीएमवर ११.१ एनएम टॉर्क देते. आयजीओ असिस्ट तंत्रज्ञानामुळे दुचाकीचे मायलेज कमी न होता चांगला पिक-अप मिळतो.
- आरामदायी सुविधा: या रेंजमधील सर्वात लांब सीट या दुचाकीला आहे. बाईकस्वारासह मागे बसणा-या प्रवाशाला आरामदायी प्रवास करता यावा म्हणून बॅक रेस्ट (पिलियन बॅकरेस्ट) आहे. या सुविधेमुळे बाईकस्वार आणि मागे बसलेल्या व्यक्तीलाही प्रवासादरम्यान अडचणी निर्माण होत नाही.
- सर्वोत्तम सोयी-सुविधा:
o ३३ अंडर सीट स्टोरेज – दुचाकीच्या आसनाखाली ३३ लिटरची जागा असून यात दोन हेल्मेट ठेवण्याची सोय आहे.
o दुचाकीत पुढच्या भागांतून पेट्रोल भरण्याची सोय सोप्पी व्हावी याची खास काळजी घेण्यात आली आहे.
o दुचाकीत लहान वस्तू ठेवण्याचीही सोय उपलब्ध आहे. समोरच्या बाजूला २ लीटरच्या बॉक्समध्ये बाईकस्वार प्रवासासाठी आवश्यक लहान वस्तू ठेवू शकतात.
- उत्कृष्ट बांधणी : मेटल पॅनलच्या वापराने दुचाकीच्या टिकाऊपणाची खात्री देता येते. प्रवासादरम्यन बाइकस्वार सुरक्षित राहतील, यासाठी खासकरुन मेटल पॅनलचा वापर केला जातो.
- स्मार्ट डिजिटल कन्सोल : डिजीटल रिव्हर्स एलसीडी डिस्प्ले खालील सोयीसुविधा पुरवतो.
o कॉल आणि एसएमएस अलर्ट
o रिअल टाइम आणि सरासरी मायलेज
o कमी इंधनाचा वापर, ट्रीप मीटर आदी सुविधा
- सशक्त टायर्सचा वापर : मोठ्या टायरमुळे दुचाकीला उत्तम स्थिरता मिळते. कठीण रस्त्यांवरही चांगली पकड घेता येते. बाईकस्वार आत्मविश्वासाने प्रवास करतात.
ज्या बाईकस्वारांना लांबपल्ल्याचा प्रवास करायचा आहे, अशा बाईकस्वारांसाठी टीव्हीएस ज्युपिटर १२५ ड्युअल टोन स्मार्टएक्सकनेक्ट ही स्टायलिश आणि व्यवहारिक गरजांसाठी नवी कोरी दुचाकी उपलब्ध आहे.
