Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन

 

पुणे : प्रसिद्ध सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांचे व्याख्यान ऐकण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी पुणेकरांना उपलब्ध होणार आहे. निमित्त आहे पुण्यातील पी एम शहा फाऊंडेशन यांच्या वतीने येत्या बुधवार दि. १४ मे रोजी आयोजित एका विशेष कार्यक्रमाचे. दुपारी ३.३० वाजता विधी महाविद्यालय रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे सदर कार्यक्रम संपन्न होईल. कार्यक्रमासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर सर्वांना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार असल्याची कृपया नोंद घ्यावी. कार्यक्रमावेळी काही जागा या निमंत्रितांसाठी राखीव असतील.

कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देताना पी एम शहा फाऊंडेशनचे संचालक ॲड. चेतन गांधी म्हणाले, “आपण ग्रहण करतो ते अन्न, आपल्या परंपरा आणि आपले आरोग्य यांचा जवळचा संबंध असून शास्त्रीय तरीही सोप्या पद्धतीने यावर संवाद साधण्याचे कौशल्य असलेल्या सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांकडून अनेक महत्त्वाच्या टिप्स समजून घेण्याची संधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुणेकरांना उपलब्ध होऊ शकणार आहेत. याद्वारे आहाराबद्दल एक नवा दृष्टीकोन निर्माण होण्यास मदत होणार असून रोजच्या धकाधकीच्या जीवनात त्याचा अवलंब करणे नागरिकांना सोपे जाणार असल्याने दिवेकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन आपण केले आहे. वर्धमान प्रतिष्ठानचे विशेष सहकार्य सदर कार्यक्रमासाठी आपल्याला लाभले आहे.” यासोबतच दिवेकर यांच्या ‘दि कॉमनसेन्स डाएट’ या पुस्तकाचे प्रकाशन हे देखील कार्यक्रमाचे आकर्षण असेल असेही ॲड. चेतन गांधी यांनी सांगितले

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading