Wednesday, June 10, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘आई तुळजाभवानी’चा विशेष भाग: अमांगल्याचा मांगल्यावर आघात!

कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ मालिका सध्या देवी अध्यायात एका अत्यंत नाट्यमय वळणावर आली आहे. महिषासुराच्या पत्नी शुंभाने, देवी तुळजाला नष्ट करण्याचा विडा उचलला आहे. महिषासुराच्या इच्छेप्रमाणे तुळजा त्याची पत्नी व्हावी, यासाठी शुंभाकडे मदत मागितली गेली. मात्र, मत्सर आणि अभिमानाने अंध झालेली शुंभा आता तुळजाभवानीचा शेवट करण्यासाठी आतूर झाली आहे. तिने भुंगासुराची मदत घेत चिंचपुरात गुपचूप प्रवेश केला, योजना आखली देवीला मानवी रक्तशोषक भुंग्यांच्या जाळ्यात अडकविण्याची, त्याचवेळेस तिला गाफील ठेवायचं आणि त्या क्षणी तिचा अंत करायचा.मात्र ही योजना तुळजाभवानी भवानीशंकरांच्या मदतीने धुळीस मिळवते.
पण आता याचवेळी, अलक्ष्मीही प्रतिशोधाच्या आगीने पेटून उठली आहे. “अमांगल्याचा मांगल्यावर आघात!” करत तीही देवीवर घाव घालण्याच्या तयारीत आहे. नक्की काय होणार ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. तेव्हा नक्की पहा आई तुळजाभवानी सोम ते शनि रात्री ९ वाजता आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.

पण जेव्हा लक्ष्मी रूपातील देवी झोपलेली असताना तिच्यावर वार होतो, तेव्हा एक अनपेक्षित घटना घडते ज्यामुळे लक्ष्मी – अलक्ष्मी यांचं कोडं सुटणार का? आई तुळजाभवानी आपले भक्त आणि मांगल्याचं रक्षण कसे करणार? हे जाणून घेण्यासाठी बघा आई तुळजाभवानी सोम ते शनि रात्री ९ वाजता आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading