जिंकुशल इंडस्ट्रीज लिमिटेडने आयपीओसाठी सेबीकडे DRHP केला दाखल
जिंकुशल इंडस्ट्रीज लिमिटेड (जेकेआयपीएल), जी बांधकाम यंत्रसामग्रीच्या निर्यात व्यापारामध्ये आघाडीची कंपनी असून, यूएई आणि अमेरिका येथे आपल्या सबसिडरीजच्या माध्यमातून उपस्थित आहे, त्यांनी प्राथमिक समभाग विक्रीसाठी (IPO) ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) सेबीकडे दाखल केला आहे.
प्रस्तावित सार्वजनिक ऑफरमध्ये प्रत्येकाची दर्शनी किंमत ₹10 असलेल्या 96.5 लाख इक्विटी शेअर्सचा समावेश आहे (सार्वजनिक ऑफर); यामध्ये 86.5 लाख नवीन इक्विटी शेअर्सचा समावेश आहे (नवीन इश्यू) आणि 10 लाख इक्विटी शेअर्सचा विक्रीसाठीचा प्रस्ताव (विक्रीचा प्रस्ताव) यांचाही समावेश आहे.
जेकेआयपीएल ही ६.९% बाजारहिश्श्यासह (केअरएज अहवालानुसार) सर्वात मोठी नॉन-ओईएम बांधकाम यंत्रसामग्री निर्यातदार कंपनी आहे. श्री. अनिलकुमार जैन, श्री. अभिनव जैन, सौ. संध्या जैन, सौ. तिथी जैन आणि सौ. यशस्वी जैन हे JKIPL चे प्रवर्तक आहेत. ही कंपनी नवीन/सानुकूलित तसेच वापरलेल्या/दुरुस्त केलेल्या बांधकाम यंत्रसामग्रींच्या जागतिक बाजारात निर्यात व्यापारामध्ये कार्यरत आहे. जेकेआयपीएल हायड्रॉलिक एक्स्कॅव्हेटर, मोटर ग्रेडर, बॅकहो लोडर, सॉईल कॉम्पॅक्टर, व्हील लोडर, बुलडोझर, क्रेन आणि डांबरीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या मशिन्स (अॅस्फाल्ट पेव्हर) यांसारख्या बांधकाम यंत्रसामग्रीच्या निर्यात व्यापारात विशेष प्राविण्य राखते..
जेकेआयपीएलला भारत सरकारच्या परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून (DGFT) थ्री-स्टार एक्सपोर्ट हाउस म्हणून मान्यता मिळाली आहे. या DRHP च्या तारखेपर्यंत, जेकेआयपीएलने यूएई, मेक्सिको, नेदरलँड्स, बेल्जियम, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि यूके यांसह तीसपेक्षा अधिक देशांमध्ये बांधकाम यंत्रसामग्रीची निर्यात केली आहे.
जेकेआयपीएल प्रामुख्याने तीन मुख्य व्यवसायिक क्षेत्रांमध्ये कार्य करते: (i) सानुकूलित, रूपांतरित आणि ॲक्सेसरीजसह सज्ज नवीन बांधकाम यंत्रसामग्रीच्या निर्यात व्यापारात, (ii) वापरलेली किंवा दुरुस्त केलेली बांधकाम यंत्रसामग्रीच्या निर्यात व्यापारात, (iii) विविध आंतरराष्ट्रीय ग्राहकांना लक्षात घेऊन ‘HexL’ या स्वतःच्या ब्रँडअंतर्गत (सध्या बॅकहो लोडर्सच्या श्रेणीत) बांधकाम यंत्रसामग्रीच्या निर्यात व्यापारात.
या DRHP च्या तारखेपर्यंत, जेकेआयपीएलने यशस्वीपणे 1,500 पेक्षा अधिक बांधकाम यंत्रसामग्री पुरवठा केला आहे, ज्यामध्ये सानुकूलित, रूपांतरित किंवा ॲक्सेसरीजसह सज्ज 900 पेक्षा अधिक नवीन यंत्रसामग्री आणि 600 पेक्षा अधिक वापरलेली/दुरुस्त केलेली यंत्रसामग्रीचा समावेश आहे.
जेकेआयपीएल प्रस्तावित नवीन इश्यूमधून मिळणारी रक्कम पुढील उद्दिष्टांसाठी वापरण्याचा मानस ठेवते: 1. कार्यकारी भांडवलीची गरज पूर्ण करण्यासाठी आणि 2. सर्वसाधारण कॉर्पोरेट गरजांसाठी.
वापरलेल्या बांधकाम यंत्रसामग्रीच्या बाजारात सातत्यपूर्ण वाढ दिसून आली असून, 2024 कॅलेंडर वर्षात याचे अंदाजित मूल्य 132.4 अब्ज अमेरिकन डॉलर होते. हा बाजार 2029 पर्यंत 177.2 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. या कालावधीतील वार्षिक वाढीचा दर (CAGR) सुमारे 6.0% आहे.
जेकेआयपीएल ही कंपनी दुरुस्तीकरण, पुनर्वापर आणि सर्क्युलर अर्थव्यवस्थेत योगदान देत असून पर्यावरणीय जबाबदारीही पार पाडत आहे. कंपनीची बाजारपेठेतील उपस्थिती वैविध्यपूर्ण आहे आणि ती बांधकाम यंत्रसामग्रीसाठी प्रभावी व अनुकूल उपाय पुरवते. तसेच, कंपनीने बांधकाम यंत्रसामग्रीच्या निर्यात व्यापार या आपल्या मुख्य व्यवसायासाठी एक कार्यक्षम व मजबूत पुरवठा साखळी पायाभूत सुविधा तयार केली आहे.
जेकेआयपीएलने ग्राहकांसोबत दीर्घकालीन संबंध प्रस्थापित केले आहेत आणि त्याचे ग्राहक वर्ग विविध आहेत. कंपनीचा आर्थिक कार्यप्रदर्शनाचा ट्रॅक रेकॉर्ड स्थिर असून, यामुळे तिच्या बॅलन्सशीटची स्थिती मजबूत झाली आहे. जेकेआयपीएलने मजबूत आर्थिक कार्यप्रदर्शन दाखविले आहे, ज्यामुळे तिच्या महसुलात 56.7% वार्षिक वाढ (CAGR) साधली आहे. कंपनीचा रिटर्न ऑन इक्विटी (ROE) 42.18% आहे, जे तिच्या भांडवली गुंतवणुकीचा प्रभावी वापर करून टिकाऊ वाढ साधण्याची क्षमता दर्शविते.
वापरलेल्या/दुरुस्त केलेल्या यंत्रसामग्रीच्या निर्यात व्यापार या व्यवसाय विभागांतर्गत, JKIPL वापरलेल्या बांधकाम यंत्रसामग्रीचे दुरुस्तीकरण करते, जेणेकरून त्यांची कार्यक्षमता वाढवता येईल आणि त्यांचा वापरकाल अधिक वाढवता येईल. या उपक्रमासाठी कंपनी रायपूर, छत्तीसगड, भारत येथे ३०,००० चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेल्या स्वतःच्या दुरुस्ती केंद्राचा (इन-हाउस रिफर्बिशमेंट फॅसिलिटी) वापर करते.
अलीकडेच JKIPL ने बांधकाम यंत्रसामग्रीसाठी स्वतःचा ब्रँड ‘HexL’ सुरू केला आहे. ‘HexL’ या ब्रँडची ही सुरुवात, इतर कंपन्यांच्या उत्पादनांच्या विक्री मॉडेलवरून स्वतःच्या ब्रँडच्या विक्री मॉडेलकडे होणाऱ्या संक्रमणाचे प्रतीक आहे. पुढे जाऊन, JKIPL आपल्या ‘HexL’ या ब्रँड अंतर्गत विविध प्रकारच्या बांधकाम यंत्रसामग्री – ज्यामध्ये इलेक्ट्रिक बांधकाम उपकरणांचाही समावेश आहे – बाजारात आणण्याची योजना आखत आहे.
जीवायआर कॅपिटल ॲडवायझर्स प्रायव्हेट लिमिटेड ही या ऑफरची एकमेव बुक रनिंग लीड मॅनेजर (BRLM) आहे.
