Saturday, June 20, 2026
Latest NewsSports

चौथ्या ‘स्पोटर्सफिल्ड करंडक’ अजिंक्यपद १२ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेचे ६ मे पासून आयोजन !!

पुणे :  स्पोटर्सफिल्ड मॅनेजमेंट तर्फे चौथ्या ‘स्पोटर्सफिल्ड करंडक’ अजिंक्यपद १२ वर्षाखालील २५-२५ षटकांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ६ ते २१ मे २०२५ या कालावधीते सातारा रस्त्यावरील टेंभेकर फार्म्स अ‍ॅकॅडमीच्या मैदानावर होणार आहे.

या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना स्पोटर्सफिल्ड मॅनेजमेंटचे संचालक आणि स्पर्धेचे संचालक सनी मारवाडी यांनी सांगितले की, स्पर्धेचे हे चौथे वर्ष असून आंतरक्लब स्पर्धेत १२ वर्षाखालील वयोगटातील एकूण १० निमंत्रित संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेचा प्रत्येक सामना हा २५-२५ षटकांचा असणार असून अंतिम सामना ३०-३० षटकांचा असणार आहे.

साखळी आणि बाद फेरीमध्ये होणार्‍या या स्पर्धेत २२ याडर्स क्रिकेट अ‍ॅकॅडमी, आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमी, किरण क्रिकेट अ‍ॅकॅडमी, स्पार्क क्रिकेट अ‍ॅकॅडमी, स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लिनिक, अष्टपैलु स्पोटर्स अ‍ॅकॅडमी, ब्रिलीयंट्स स्पोटर्स अ‍ॅकॅडमी, क्लब ऑफ महाराष्ट्र, क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी ब संघ आणि स्पार्क स्पोर्टीव्ह क्रिकेट अ‍ॅकॅडमी या १० निमंत्रित संघांमध्ये विजेतेपदाची चुरस पहावयास मिळणार आहे.

स्पर्धेतील विजेत्या संघाला आणि उपविजेत्या संघाला मेडल्स् आणि करंडक मिळणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक, उदयोन्मुख खेळाडू याबरोबरच मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ही वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक सामन्यासाठी सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि फायटर ऑफ द मॅच अशी पारितोषिके देण्यात आहेत.

स्पर्धेच्या उद्घाटनाचा सामना स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लिनिक विरुद्ध २२ यार्डस  या दोन संघांमध्ये होणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading