इंडियन मेडिकल अससोसिएशन च्या अध्यक्षपदी डॉ. सुनील इंगळे
पुणे : इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून डॉ. सुनील इंगळे यांनी सूत्रे हाती घेतली. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आयएमए चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दिलीप भानुशाली उपस्थित होते. डॉ. दिलीप भानुशाली यांनी आय. एम ए. पुणे च्या कामाची प्रशंसा केली. आय. एम. ए समोरील असलेल्या विविध समस्यांचा त्यांनी उहापोह केला. आय एम ए पुणेच्या रशटीम चे मॉडेल पूर्ण देशभर राबवण्याचे नमूद केले.
समारंभाचे विशेष अतिथी म्हणून श्री. मिलिंद मोहिते, DCP Special Branch, पुणे त्यांनी पुणे शाखेने केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक केले. समाज, डॉक्टर्स, आणि राजकीय लोकांनी संयम ठेऊन एकमेकांशी संवाद करणे महत्वाचे आहे. डॉक्टर चे काम एखाद्या मार्गदर्शका सारखे आहे. वैद्यकीय विश्वासमोर खूप मोठी आव्हाने उभी आहेत असे सांगितले.
आयएमए पुणेचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. सुनील इंगळे म्हणाले, “आयएमए पुणेचा ९७ वर्षांचा समृद्ध वारसा आहे. “सर्वांसाठी आरोग्य” ह्या संकल्पनेने पुढील वर्षभर कार्यक्रम घेण्याचे त्यांनी जाहीर केले.
मंचावरील इतर मान्यवरांमध्ये आय. एम. ए चे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे, आय. एम. ए महाराष्ट्र राज्याचे निर्वाचित अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी, सचिव डॉ. अनिल आव्हाड, आय. एम. ए पुणे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश भुतकर, कार्यकारी विश्वस्त डॉ.संजय. पाटील, डॉ.जयंत नवरंगे व पुण्यातील अनेक प्रतिष्ठित डॉक्टर्स उपस्थित होते.
नवीन कार्यकारिणी समिती २०२५-२६ — अध्यक्ष – डॉ. सुनील इंगळे, निर्वाचित अध्यक्ष डॉ. अलका क्षीरसागर, उपाध्यक्ष डॉ. गीतांजली शर्मा, कोषाध्यक्ष – डॉ. सचिन लकडे, सचिव – डॉ. रणजीत घाटगे, सचिव – डॉ. अंजली साबणे, सहसचिव – डॉ. रवींद्र छाजेड, उपसचिव डॉ. अर्चना शिंगवी, मावळते अध्यक्ष डॉ. राजन संचेती.
