बजाज अलियान्झ लाईफ इन्शुरन्सतर्फे खास महिलांसाठी सर्वसमावेशक सुरक्षा योजना सादर
पुणे : भारतातील आघाडीच्या खासगी जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या बजाज अलियान्झ लाईफ इन्शुरन्सने बजाज अलियान्झ लाईफ सुपरवुमन टर्म (SWT) ही महिलांसाठी खास तयार केलेली सर्वसमावेशक सुरक्षा योजना सादर केली आहे. ही क्रांतिकारी योजना पारंपरिक जीवन विम्याच्या पलीकडे जाऊन टर्म इन्शुरन्स लाभ, महिलांसाठी खास गंभीर आजार संरक्षण लाभ, पर्यायी चाइल्ड केअर बेनिफिट आणि आरोग्य व्यवस्थापन सेवा यांचा समावेश करत महिलांना आणि त्यांच्या कुटुंबांनाही सर्वांगीण संरक्षण देत आर्थिक सुरक्षा पुरवते.
महिला त्यांच्या कुटुंबाची काळजी उत्कृष्टपणे घेतात आणि त्यांच्या स्वतःच्या आर्थिक सुरक्षेचाही विचार तितक्याच ताकदीने व्हायला हवा. बजाज अलियान्झ लाईफ सुपरवुमन टर्म महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी ठेवण्यास मदत करते, त्यांच्या जीवनातील प्रत्येक टप्प्यावर आर्थिक आत्मविश्वास व स्थिरता देत त्यांचे जीवन ध्येय साध्य करण्यासाठी आधार देते. या योजनेची मुख्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
टर्म इन्शुरन्सद्वारे सर्वसमावेशक आर्थिक सुरक्षा: महिलांची बदलती भूमिका आणि त्यांच्या विशिष्ट आर्थिक गरजा लक्षात घेऊन SWT ही योजना जीवन विमाधारकाच्या मृत्यूनंतर नामनिर्देशित व्यक्तीस एकरकमी रक्कम देऊन कुटुंबाचा आर्थिक भविष्यकाळ सुरक्षित करते.
- गंभीर आजार संरक्षण (CI Protection): CIरायडरच्या साहाय्याने SWT 60 प्रमुख गंभीर आजारांपासून संरक्षण देते. त्यात स्तन, गर्भाशय ग्रीवा व अंडाशयाचा कर्करोग यांसारख्या महिला विशिष्ट आजारांचाही समावेश आहे. त्यामुळे उपचारादरम्यान आर्थिक तणाव न घेता महिला आरोग्यावर लक्ष केंद्रित करू शकतात. तणावमुक्त राहणे हे तेव्हा सर्वात महत्वाचे असते.
- चाइल्ड केअर बेनिफिट: मुलाच्या भविष्याची काळजी लक्षात घेऊन या योजनेत पर्यायी चाइल्ड केअर बेनिफिट देण्यात आले आहे—SWTसोबत प्रथमच सादर करण्यात आलेली ही सुविधा दुर्दैवी घटनेमध्ये मुलाच्या शिक्षणासाठी स्थिर मासिक उत्पन्नाची व्यवस्था पुरवते.
- आरोग्य व्यवस्थापन सेवा (HMS):आर्थिक सुरक्षेपलीकडे जाऊन ही योजना संपूर्ण आरोग्य तपासणी, ओपीडी सल्लामसलत, गर्भधारणेशी संबंधित सहाय्य, भावनिक आरोग्य प्रोग्रॅम्स व आहारतज्ञ मार्गदर्शन यांचा समावेश असलेल्या मोफत HMS सेवा देते—या सुविधेमुळे महिलांच्या सर्वांगीण कल्याणासाठी कंपनीची बांधिलकी अधोरेखित होते.
बजाज अलियान्झ लाईफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. तरुण चुग म्हणाले, “आजच्या महिला त्यांचे आरोग्य, मुलांचे कल्याण व आर्थिक स्वातंत्र्य यांना प्राधान्य देतात. त्यांच्यासाठी बजाज अलियान्झ लाईफ सुपरवुमन टर्म या एकाच आर्थिक उपायसुविधेद्वारे या सर्व गरजा पूर्ण करणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. ही योजना महिलांना त्यांच्या वैयक्तिक ध्येयाकडे आत्मविश्वासाने वाटचाल करण्यासाठी आर्थिक बळ देते. स्वतःच्या आरोग्याची देखभाल असो किंवा आपल्या मुलांचे किंवा प्रिय व्यक्तींचे भविष्य सुरक्षित करणे असो ही सर्वसमावेशक योजना आमच्या महिला ग्राहकांच्या विविध गरजांनुसार सानुकूल करता येते.”
याव्यतिरिक्त, बजाज अलियान्झ लाईफने गेल्या काही वर्षांत आपल्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये विविध टर्म योजना समाविष्ट करून तो अधिक मजबूत केला आहे. जसे की:
बजाज अलियान्झ लाईफ ई-टच II (नॉन लिंक्ड, नॉन पार्टीसिपेटिंग इंडिव्हिज्युअल लाईफ इनश्युरन्स टर्म प्लॅन) विशेषतः पगारदार व्यक्तींसाठी डिझाइन केलेली योजना.
बजाज अलियान्झ लाईफ आयसिक्युअर II (नॉन लिंक्ड, नॉन पार्टीसिपेटिंग इंडिव्हिज्युअल लाईफ इनश्युरन्स टर्म प्लॅन) – स्वयंरोजगार असलेल्या व्यावसायिकांसाठी समर्पित योजना.
बजाज अलियान्झ लाईफ डायबेटिक टर्म प्लॅन II सब 8 HbA1c (नॉन लिंक्ड, नॉन पार्टीसिपेटिंग इंडिव्हिज्युअल, प्युअर रिस्क प्रीमियम लाईफ इनश्युरन्स प्लॅन) – मधुमेहींसाठी खास तयार केलेली भारतातील पहिली टर्म योजना.
बजाज अलियान्झ लाईफ इन्वेस्ट प्रोटेक्ट गोल III (युनिट लिंक्ड, नॉन पार्टीसिपेटिंग इंडिव्हिज्युअल लाईफ सेव्हीग्ज इनश्युरन्स प्लॅन ) उच्च जीवन संरक्षण आणि मार्केट-लिंक्ड परतव्याच्या संधीचे अद्वितीय संयोजन. या पोर्टफोलिओमध्ये विविध ग्राहक विभागांसाठी अनेक उत्पादने आहेत. कंपनीने 99.23% दावा निवारण प्रमाण (वैयक्तिक मृत्यू दाव्यांचे निवारण प्रमाण वित्तीय वर्ष 2023-2024 साठी) आणि 432% सॉल्व्हन्सी रेशो (31 मार्च 2024 पर्यंत) यांसारख्या विश्वसनीयतेच्या निकषांवर आपली बांधिलकी कायम राखली आहे. नाविन्यपूर्ण आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनासह, बजाज अलियान्झ लाईफ आपल्या बदलत्या ग्राहकांच्या गरजांनुसार संरक्षण उपाय सुविधा पुरवण्यात अग्रेसर आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या: https://www.bajajallianzlife.com/about-us.html
