जेएसडब्ल्यू पेंट्स तर्फे ‘रंगों का खेल 2.0’ चे अनावरण
मुंबई : भारतातील आघाडीची पर्यावरणपूरक पेंट्स कंपनी आणि 24 अब्ज अमेरिकी डॉलरचे मूल्य असलेल्या जेएसडब्ल्यू समूहाचा भाग असलेली जेएसडब्ल्यू पेंट्स आयपीएल 2025 साठी ‘रंगों का खेल 2.0’ ही एक नवीन मोहिम सुरु करण्यासाठी सज्ज आहे. मागील मोहिमेच्या यशावर आधारित ही नवीन आवृत्ती रंग, समुदायभावना आणि दिग्गज चेहऱ्यांच्या एकत्रीकरणासह सिनेमॅटिक आणि उत्सवी अनुभव एका नव्या उंचीवर घेऊन जाते. TBWA\India यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही ॲन्थम क्रिकेटच्या रंगीबेरंगी, जोशपूर्ण उत्साहाचे प्रतीक आहे.
गल्लीत सुरू असलेला मुलांचा क्रिकेट सामना या एका परिचित प्रसंगाने या फिल्मची सुरुवात होते. जेव्हा क्रिकेटचे दिग्गज सुनील गावसकर आणि मिताली राज यांचा अचानक प्रवेश होतो तेव्हा सामना एका अनपेक्षित वळणावर पोहचतो. त्यानंतर जे काही घडते ते म्हणजे एक भव्य दृश्यात्मक रूपांतरण. ‘रंगों का खेल है’ या ॲन्थमच्या तालावर, फिल्ममध्ये मुले, प्रौढ आणि क्रिकेटचे दिग्गज आयपीएल व डब्ल्यूपीएल मधील विविध संघांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रंगांनी एकत्र येऊन संपूर्ण परिसर पुन्हा रंगवताना दिसतात. जेएसडब्ल्यू पेंट्स च्या विविध रंगांच्या श्रेणीतून प्रेरणा घेतलेली ही संकल्पना आनंद, एकोपा आणि क्रिकेटला खऱ्या अर्थाने भव्य बनवणारी भावना यांचे प्रतिनिधित्व करते.
जेएसडब्ल्यू पेंट्सने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आणि विमेन्स प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) मधील आठ संघांसोबत भागीदारी केली आहे. जेएसडब्ल्यू पेंट्ससाठी ही आतापर्यंतची सर्वात मोठी ब्रँड भागीदारी आहे. त्यामध्ये JSW समूहाच्या सहमालकीच्या दिल्ली कॅपिटल्स (DC), कोलकाता नाईट रायडर्स (KKR), सनरायझर्स हैद्राबाद (SRH), राजस्थान रॉयल्स, (RR) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) या संघांचा समावेश आहे. तसेच गुजरात जायंट्स, दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरीयर्स या तीन डब्ल्यूपीएल संघ यांचाही यात समावेश आहे.
या मोहिमेबाबत जेएसडब्ल्यू पेंट्सचे सह व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदरसन ए. एस. म्हणाले, “आजचे क्रिकेट हा रंग आणि भावनांचा एक ऊर्जा देणारा सण झाला आहे. ‘रंगों का खेल 2.0’ मध्ये आम्ही कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांशी असलेला आमचा बंध अधिक दृढ करत हेच सार पकडण्याचा प्रयत्न करत आहोत. क्रिकेट दिग्गज, समुदायभावना आणि आमच्या विविध रंगांच्या तेजस्वी श्रेणीसह आम्हाला हे दाखवायचं होतं की रंग केवळ सजावटीपुरते नसतात. ते कोणतीही जागा सुंदर आणि अर्थपूर्ण बनवू शकतात.”
जेएसडब्ल्यू पेंट्सचे मुख्य व्यवसाय अधिकारी आशीष राय म्हणाले, “क्रिकेटमध्ये लोकांना प्रेरित करण्याची आणि एकत्र आणण्याची ताकद आहे असा विश्वास जेएसडब्ल्यू पेंट्स मध्ये आम्हाला सगळ्यांना आहे. यंदा आयपीएल व डब्ल्यूपीएल संघांसोबतची आमची वाढलेली भागीदारी ही चाहत्यांशी आमचा अधिक खोलवर बंध प्रस्थापित करण्याचा आमचा संकल्प दर्शवते. ‘रंगों का खेल 2.0’ ही फक्त एक जाहिरात मोहिम नाही, तर ती क्रिकेट आणि रंग एकत्र येऊन निर्माण करत असलेल्या उत्कटता, ऊर्जा आणि एकतेचा उत्सव आहे.”
TBWA\India चे मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद पांडे म्हणाले, “स्पर्धात्मक रंग मैदानावर झळकतात, पण खेळावरील प्रेमाचा रंग कधीही बदलत नाही – तो प्रत्येक घरात साजरी होणारी उत्सवाची भावना पसरवतो. ही ॲन्थम तेजस्वी, रंगीबेरंगी आणि सगळ्यांना एकत्र आणणाऱ्या क्रिकेटच्या जादूचा उत्सव साजरा करते. जेव्हा आपण ‘Think Beautiful’ ची निवड करतो, तेव्हा अशक्यसुद्धा शक्य होऊ लागते याची हळुवार आठवणही या फिल्मची संकल्पना करून देते.”
TBWA\India चे सीसीओ रसेल बॅरेट म्हणाले, “आमची ही मोहिम आयपीएलची ऊर्जा, क्रिकेटप्रेमींचा उत्साह आणि या खेळाची जोशपूर्ण भावना एकत्र आणते. जो जोश, उत्साह आणि एकतेचा बंध क्रिकेट घेऊन येते त्याचे प्रकटीकरण म्हणजे ‘रंगों का खेल 2.0’ आहे. आयपीएल 2025 मध्ये हा प्रवास असाच आणखी मोठ्या प्रमाणात पुढे नेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”
स्पर्धा जसजशी पुढे जाईल, तसतसे जेएसडब्ल्यू पेंट्स सर्व चाहत्यांना क्रिकेटच्या या जोशाला आपल्यात सामावून घेण्याचे, आपल्या संघांचे उत्साहात समर्थन करण्याचे आणि या खेळाचा उत्सव साजरा करण्याचे आमंत्रण देत आहे.
