पुणे जिल्हा संघाची दणदणीत विजयी सलामी !!
पुणे, : वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (डब्ल्युआयएफए) यांच्यावतीने आयोजित ‘महाराष्ट्र राज्य आंतर-जिल्हा अजिंक्यपद’ फुटबॉल २० वर्षाखालील मुलांच्या स्पर्धेत पुणे जिल्ह्याच्या संघाने वाशिम संघाचा १९-० असा धुव्वा उडवित दणदणीत सलामी दिली.
सिंहगड इन्स्टिट्युट कॉलेज कँपस, लोणावळा येथे आजपासून सुरू झालेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत स्पर्धेसाठी पुण्यासह रत्नागिरी, अहमदनगर, वाशिम, ठाणे, उस्मानाबाद, रायगड, वर्धा, भंडारा, मुंबई, नंदूरबार, जळगांव, कोल्हापुर, नांदेड, नागपूर आणि चंद्रपुर या जिल्ह्यांचे संघ सहभागी झाले आहेत. पुणे संघाच्या पहिल्याच सामन्यामध्ये त्यांनी वाशिम संघाचा दीड डझन गोलांनी सहज पराभव केला. पुणे संघाच्या मयुर वाघिरे याने सर्वाधिक ५ गोल नोंदविले. अरहेव जोधवानी, निशित फडके आणि यहया शेख यांनी प्रत्येकी तीन गोल केले. अथर्व खडतरे आणि अब्दुल शेरकर यांनी प्रत्येकी दोन गोल तर, सौद हकीम याने एक गोल केला.
सामन्यांचा सविस्तर निकालः
पुणे जिल्हाः १९ (मयुर वाघिरे ४, ६, ९, ३४, ६० मि., अरहेव जोधवानी १३, २९, ४७ मि., सौद हकीम २० मि., निशित फडके २६, ३९, ६७ मि., अथर्व खडतरे १५, ४८ मि., अब्दुल शेरकर ४४, ५३ मि., यहया शेख १२, ३१, ६७ मि.) वि.वि. वाशिम संघः ०;
