सोनी इंडियातर्फे प्रगत नॉइज कॅन्सलेशन आणि AI-सक्षम कॉल क्लॅरिटीसह LinkBuds Fit सादर करत असल्याची घोषणा
नवी दिल्ली : वैयक्तिक ऑडिओ क्षेत्रात एक नवीन मानदंड प्रस्थापित करत सोनी इंडियाने आज LinkBuds Fit इयरबड्स सादर केले. अल्ट्रा-कंफर्टेबल फिट, प्रीमियम साऊंड आणि इंटेलिजंट नॉईज कंट्रोल यांनी हे इयरबड्स सुसज्ज आहेत. संपूर्ण दिवस परिधान करण्यासाठी डिझाइन केले गेलेले हे इयरबड्स एअर फिटिंग सपोर्टर्स आणि मऊ इयरबड टिप्ससह असून सुरक्षित आणि वजनाला हलके आहेत.
सोनीने LinkBuds Fit साठी अनेक वर्षे संकलित केलेल्या व्यापक इयर शेप डेटाचा वापर करून नवीन एअर फिटिंग सपोर्टर्स विकसित केले आहेत. LinkBuds Fit हे इयरबड्स संपूर्ण दिवस आरामदायी वापरासाठी डिझाइन करण्यात आले असून त्यात एअर फिटिंग सपोर्टर्स आणि मऊ इयरबड टिप्स आहेत. त्यामुळे हे इयरबड्स अगदी व्यवस्थित बसतात. त्यांचे वजन केवळ 4.9 ग्रॅम आहे. त्यांचे वजन इतके कमी आहे की तुम्ही त्यांचा वापर करत असल्याचे देखील विसरू शकता.
LinkBuds Fit मध्ये सोनीचा अत्याधुनिक Integrated Processor V2 आहे. तो प्रमुख मॉडेल WF-1000XM5 मध्येही वापरला जातो. त्यामुळे हे इयरबड्स प्रगत नॉइज कॅन्सलेशन देतात. त्यामुळे संपूर्णपणे गुंगवून ठेवणारा श्राव्य अनुभव मिळतो. LinkBuds Fit मध्ये सोनी चे उत्कृष्ट अॅम्बियंट साउंड तंत्रज्ञान समाविष्ट असून संगीत ऐकताना बाहेरील आवाज पूर्णपणे नाहीसे न होता नैसर्गिक पद्धतीने ऐकण्याचा अनुभव घेता येतो. त्यामुळे सभोवतालच्या परिस्थितीशी कनेक्ट राहता येते. Auto Ambient Sound मोड बाहेरील आवाजाची पातळी स्मार्टपणे समायोजित करतो. त्यामुळे वापरकर्ते संगीताचा आनंद घेत असतानाही जागरूक राहू शकतात.
LinkBuds Fit उच्च-रिझोल्युशन ऑडिओ वायरलेसला सपोर्ट करतात आणि यामध्ये LDAC™ ऑडिओ कोडिंग तंत्रज्ञानाचा समावेश आहे. LDAC पारंपरिक Bluetooth® ऑडिओपेक्षा तीनपट जास्त डेटा वहन करू शकते, ज्यामुळे हाय-रिझोल्युशन ऑडिओ आशय अधिक उत्तम गुणवत्तेत अनुभवता येतो. यामध्ये डायनॅमिक ड्रायव्हर X आहे, जो विस्तृत फ्रिक्वेन्सी रिप्रॉडक्शनसाठी डिझाइन करण्यात आला आहे. यामुळे अधिक स्पष्ट स्वर आणि सूक्ष्म आवाज अधिक चांगले ऐकू येतात.
AI-सक्षम अल्ट्रा क्लिअर कॉल्स तंत्रज्ञानामुळे LinkBuds Fit वर कॉलिंगचा, संवाद साधण्याचा अनुभव अप्रतिम आहे. Precise Voice Pickup Technology च्या मदतीने इयरबड मायक्रोफोनची कामगिरी सर्वोत्तम करतात आणि आजूबाजूचा आवाज गाळला जातो. त्यामुळे कॉल क्लॅरिटी उत्कृष्ट मिळते. याशिवाय, Auto Play आणि Quick Access सारखी वैशिष्ट्ये Amazon Music Play Now किंवा Spotify Tap तसेच LinkBuds Fit मधील वॉइस कंट्रोल सोबत सुलभरित्या समाकलित केली गेली आहेत. त्यामुळे सुलभपणे मनोरंजनाचा आनंद घेता येतो. जोडीला Wide Area Tap वैशिष्ट्यामुळे, वापरकर्ते इयरबड्सला स्पर्श न करता फक्त कानाच्या पुढच्या भागावर डबल किंवा ट्रिपल टॅप करून संगीत नियंत्रित करू शकतात.
LinkBuds Fit मध्ये Multipoint Connection, इंस्टंट प्ले आणि पॉज, हेड गेस्टर्सने कंट्रोल, बिल्ट-इन व्हॉईस कंट्रोल आणि Speak-to-Chat सारखी प्रगत वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये 21 तासांची एकूण प्लेबॅक बॅटरी लाइफ आहे. जर बॅटरी कमी झाली, तर फक्त 5 मिनिटांच्या क्विक चार्जमध्ये 1 तास प्लेबॅक मिळू शकतो. हे IPX4 वॉटर रेझिस्टन्स रेटिंग असलेले इयरबड्स आहेत.
लॉन्चिंग सवलत, किंमत आणि उपलब्धता
| Sony ने LinkBuds Fit साठी एक खास लाँच ऑफर जाहीर केला आहे. या ऑफरअंतर्गत, ग्राहक हे इयरबड्स फक्त ₹18,990/- या विशेष किमतीत खरेदी करू शकतात आणि त्यांना ₹5,990/- किमतीचा SRS-XB100 पोर्टेबल स्पीकर मोफत मिळेल. ही ऑफर 7 एप्रिल 2025 पासून सुरू होत आहे आणि मर्यादित कालावधीसाठी वैध आहे. | |||||||
| मॉडेल | खरेदीची सर्वोत्तम किंमत (रु. मध्ये) | उपलब्धता | रंग | ||||
| LinkBuds Fit | 18,990/- रु. | 07 एप्रिल 2025 च्या पुढे | काळा, पांढरा, हिरवा |
