Saturday, May 30, 2026
BusinessLatest News

पुनावाला फिनकॉर्पतर्फे शॉपकीपर लोन व्यवसाय लाँच

मुंबई :  पुनावाला फिनकॉर्प लिमिटेड (पीएफएल) या सायरस पुनावाला ग्रुप प्रमोटेड आणि कन्झ्युमर व एमएसएमई कर्ज क्षेत्रावर भर देणाऱ्या एनबीएफसी कंपनीने आज शॉपकीपर लोन बिझनेस लाँच केला आहे. या सुविधेअंतर्गत छोटे रिटेलर्स आणि किराणा दुकानांना येणाऱ्या महत्त्वाच्या आर्थिक व इतर अडचणी सोडवण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामध्ये कॅश फलोइन्व्हेंटरी आणि ग्राहक संवाद यांचाही समावेश असून त्यांच्या कार्यकारी क्षमता विकसित केल्या जाणार आहेत.

स्वयंरोजगार मिळवणाऱ्या या क्षेत्राची पसंतीची आर्थिक पुरवठादार होण्याच्या ध्येयासह काम करत पीएफएलने खास तयार केलेल्या आर्थिक सुविधांच्या मदतीने छोट्या रिटेल व्यवसायांची स्पर्धात्मकता वाढवण्याचे ठरवले आहे.

या लाँचविषयी पुनावाला फिनकॉर्पचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अरविंद कपिल म्हणाले, ‘छोटे रिटेलर्स आपल्या ग्राहक अर्थव्यवस्थेचा कणा आहेत आणि तरीही गरजेच्या वेळी कर्ज उपलब्ध न होण्याच्या अडचणीमुळे त्यांच्या विकासाला मर्यादा येत आहेत. आमच्या शॉपकीपर लोनच्या मदतीने ही दरी सांधण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. या सुविधेअंतर्गत त्यांच्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या आर्थिक उत्पादनाचा समावेश असून त्याद्वारे भांडवलाची गरज पूर्ण केली जाईल तसेच व्यवसाय दीर्घ काळ टिकून राहाण्यासाठी सहकार्य केले जाईल. जोखमीस प्राधान्य आणि ग्राहकाभिमुख धोरण यांच्या एकत्रीकरणातून आम्ही या व्यवसायांना रिटेल क्षेत्रात वेगाने वाढत असलेल्या स्पर्धेत विकास करण्यासाठी सक्षम बनवण्याचे ध्येय ठेवले आहे.’

छोटे रिटेलर्स आणि किराणा दुकाने भारताच्या पारंपरिक देशांतर्गत व्यापाराचा महत्त्वाचा भाग आहेत आणि ते निमशहरी तसेच लहान गावांत सातत्याने स्थानिक अर्थव्यवस्थेसाठी लक्षणीय योगदान देत आहेत. मात्रबहुतेक वेळा ही दुकाने कुटुंबाकडून मिळणाऱ्या पैशांवर अवलंबून असतात. त्यांना औपचारिक पद्धतीने कर्ज उपलब्ध करण्यासाठी मुबलक व आकर्षक संधी उपलब्ध आहेत असे पीएफएलला वाटते.

कंपनीने देशभरातील छोटे रिटेलर्स आणि किराणा दुकानांना खास तयार केलेली आर्थिक उत्पादने पुरवण्याचे ध्येय ठेवले आहे. पहिल्या टप्प्यात पीएफएल ४४ ठिकाणी काम सुरू करत ग्राहकाभिमुख धोरणासाठी आपली यंत्रणा संस्थागत करत आहे. शॉपकीपर लोन व्यवसायाचे लाँच करून पीएफएलने आता ४ नवे व्यवसाय लाँच केले आहेत.

जोखमीस प्राधान्य या तत्वावर आधारित आर्थिक सुविधा पुरवून पीएफएलने भारतातील अतिशय महत्त्वाच्या, लहान व्यवसायांचा समावेश असलेल्या रिटेल यंत्रणेची दीर्घकालीन विकासाची संभाव्यता, शाश्वतता व स्पर्धात्मकता वाढवण्याचे ठरवले आहे. कंपनी यापुढेही कर्ज पुरवठा, ग्राहक समाधान आणि अनुभव आणखी सुखद करण्यावर भर देण्याचे ठरवले आहे.

अधिक माहितीसाठी भेट द्या  website or download the Poonawalla Fincorp app.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading